भावनासन जाये

भावनासन जाये

गहिवरन मन्ह मन
कस सांगु कोनला…
नातं सारख समायत ऊनू
नही कयन कोनाच ध्यानले…!!

नाताना वल्लावामा
गुतीसन मी पडनू
ऊनी ये कशी कायनी
आज एकटा व्हयनू….

सर्वांसन मन समायतांना
सावधथीन टाकात मी पाऊल…
मन्हावर यीन ये एकलानी
नही लागनी माले चाहूल…!!

मन मन्ह साध भोय
म्हनत ऊनू मन्हा समधासले….
नातासन झाया मजार भटकेल
कयनू नही मी त्यासले….!!

समाईसन चालनू रस्तावर
तरी ठोकर पायले लागनी..
गहिवरन मन भलतच
मननी इच्छाच मरनी…!!

नको खे खेऊ लपा छपीना
येना पुढे कोना संगले…
गईसन पडन्यात भावना
गद्दार शेवट राहू तुना ध्यानाले…!!

Psi विनोद बी.सोनवणे

धुळे
दिनांक =०६-१२-२०२३