जिवन ना घोलवर

जिवन ना घोलवर


जिवन ना घोलवर
कोन से तुना संगले..
ज्याले जिव लावा
तोच गया ईरोधना रस्ताले…!!

काय उरन तुन अस्तित्व
पक्षी जसा घायाळ व्हयना..
जिवनी नही कयी परवा
एक सेकंदमा पडदा आडमा व्हयना…!!

जिवनभर साथ देवाना वायदा
अचानक आज ईरोधी बोल झायात…
तुले स्मशांनले लई जानाराच
कोरडा अश्रू गातत मांगे ऊनात…!!

स्वतःन मन मारीसन तु
भलतीच काळजी लिनी समोरनी…
तठे भेटनी दुसरानी साथ आते
तुनी कसानीच आस नही रायनी…!!

गद्दारीना खे खिदा मस्त
मात्र तु एकदम चुप रायना…
दिन रात्र तडपत रायना आजवर
मात्र तुना डोयासले दु:खना अश्रू ऊनात …!!

तुले सोडतांना आनंद भलता झाया
जणू काय तिन गंगा स्नान झाये…
याद ठेव यिन एक दिन असा
तिना नसीबे तेल बी गये तूप पन गये…!!

Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०३-१२-२०२३