धाबावरनं सीताफय

धाबावरनं सीताफय

अहिराणी लेख

नानाभाऊ माळी

सीताफय!नाव पवतीर आनी गोड!सीतामयनं पवित्र रूप त्याम्हा दिखास!वरसारद आनी हिवायानां मोसम दखी नेम्मन आपला गोडवा लयी येस!वरतीन निय्या खवड्या खवड्या टिकल्या जश्या शंकरपायीचं!पोटमां गोड धव्य्याबरफ गिद्दू!गिद्दूम्हा काया मटक बीय्यास्ना बुचका!पिकेलं सीताफय तें हातम्हा अजिबात ठयेरत नई!मधमानां गिद्दू लिबलिबी व्हयी सीताफयनां आकार-उकार बिघाडांना मांगे लागी जास!सीताफय फोडीस्नी खावांनं येंलें गिद्दू गिद्दू चोखता-चोखता मज बच बच बीय्या तोंडम्हा गोया व्हयी जातीस!धव्य्या गिद्दूम्हा जीभ फिरत ऱ्हास!सीताफय खावाना गोडवा आनंद लेत ऱ्हावो!गिद्दू गयामा घट्टकरी चालना जास!मन गरायी जास!चघयी-चुघई तोंडम्हाईन बीय्यास्ना बुचका फुर्रकरी थुकी देवो!

सीताफय..बरेड,खडकाय,लाल-भुरट माटीनां वावरेस्मझार उगत ऱ्हास!कव्हयं जंगलेस्मझार भी आथ-तथ उगेल दिखस!वरसारदम्हा हुभा सीताफयनां झाडेसलें निय्यागार पांट्टास्मा लपेल बारीक बारीक
फांट्यासलें फुले येलं दिखतस!एक एक दिन जास,तसा फुलेस्मझार
धाकल्ला बोरेंस्ना आकारनां शीताफयें लटकेलं दिखतंस!एक एक दिनथून मोठ मोठ्ठला व्हतं दिखतंस!आंगे-डिले वाढत ऱ्हातसं!धाकल्ल्या हेंगड्या वाकड्या बारीक चीटिंग एक एक फांट्यास्वर पाच पाच,सव-सव सीताफय लंबकेलं दिखतंस!फांट्यास्वर लंबेल खवल्या खवल्या टिकल्यास्मझार सीताफय नजरम्हा भरायी जास!



वार्गी उनी का सीताफयंनी फांटी हिंद्या-हुंद्या खायी सीताफयसलें नाचडतं ऱ्हास!मानोस्ना नजरलें चटोरी जीभलें काय सांगो?बह्यखाडतं ऱ्हास?जीभ कोल्ला-मोल्ला व्हटस्वर फिरत ऱ्हास!डोया नींघेलं आन पिकेलं सिताफय दखी तें जीभना शेंडावरली लाय तोंडम्हानं-तोंडंम्हा गाललें ढुंश्या मारत ऱ्हास!

सांगानी गोट आशी सें!.. वावर जंगलम्हानं सीताफय दिखतं ऱ्हास!बंगला,घरन्हा मांगे-मव्हरे दिखतं ऱ्हास!पन घरना तिसरा मजलावरनां टेरेसवर सीताफयन्ह झाड आपला दखाम्हा नई उंन व्हनारं!…खरं
सांगानं म्हणजे,आम्हनी गल्ली भलती निरुंग सें!गल्ली म्हायीन मुश्किलथिन रिक्षा जातं येत ऱ्हास!आठेचं आपलं घर भांदेलं सें!तिसरा मजलान्हा टेरेसवर फुलेस्ना येली-झाडे सेतस!गॅलरीनां कोपरा दखी थोडी माटी टाकेल व्हती!तठे गुलाबी जासवंदीनां फुले येत ऱ्हातसं! दोन-आडीच वरीस पहिले सीताफयनं रोप माटीम्हायीन वर येता दिखनं!पानीन्हा वल्लाव्वाम्हा चांगलं मोठं व्हयी गे!

या वरीससलें सीताफयन्हा झाडलें चांगला दहा तें बारा सीताफय येलं
दिखनातं!आज तें कमाल व्हयनी!खटलं बोलनं, “आव्ह!डोया न्हीघेलं सीताफय झाडवरचं पिकी जायेलं सें!” मी तें नातूसंगे टेरेसवर ख़ुशीम्हा पयेत सुटनू!आद्धरं तोडं!आनी खटलान्हा हातम्हा दिध!बाई घरमा लयी गयी!देवन्हा मव्हरे ठेवं!नातू तवलोंग थांबस का हो? फिरी फिरी देव्हारागंम पयें!

नातुनी आखेर सीताफयवर हात मारी दिन्हा!त्यान्हा बोटे सीताफयनां गिद्दू लयीस्नी बाहेर उनातं!खटलं नातुवर खेकस्नी!पन नातू गुदारा देस का हो?गोडी गुलाबीम्हा नातूफायीन आर्ध सीताफय लिध!चव!!!.. काय सांगू?साखरचं जशी!सोताना वावरनागत येलं फयन्हा अभिमान वाटसं!तसा सोताना टेरेसवर येलं “सीताफयनी” गोडी जीभवर ऱ्हायी गयी!आजून दहा-बारा सीताफय झाडलें लागेल सेतस!कोनलें वानोया लागतीनं तें आगावू सांगा? सतानां टेरेसवरनां सेतस बरं!!जितला सेंतं तितला वानोया धाडी दिसू!
नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह मु हडपसर, पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०६ डिसेंबर २०२3

img 20231206 wa01113148749474717923132