Poetry in Ahirani Language
आसं जीवननं गाड
जठे जास तठे कसं
मन्हा संगे मांगे येसं
आसं कसं व्हयी मनं
कसं खेयं बी खेयसं ॥धृ॥
सुखम्हाबी दुखम्हाबी
मन्हा संगेच मिरस
मन्हा संगे र्हायीसनी
दूर दूर बी फिरसं॥१॥
नही साथ बी सोडस
याना बिगर आडसं
देखा बिगरचं माले
यानं दर्सन घडसं ॥२॥
जेबी जव्हयं बितसं
बठ्ठं यालेच सांगसं
याना भरसे वं मी बी
नित सपन देखसं ॥३॥
पुरं करा साठी तेबी
मन्हा संगे धडपडस्
कधी आटक बी येस
भार यावर पडसं ॥४॥
मंग दवा पानी मीबी
याना करता करसं
एक मेकनी जतन
आम्ही आसा करतसं॥५॥
हाऊ माले मीबी याले
देेखा आशी जगाडसं
जीवननं गाडं आसं
नित आम्हनं चालसं॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि. जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३