अहिराणी कविता अंहकार
अहिराणी कविता अंहकार
अंहकारमा रावण नष्ट झाया
मानवीले गर्व कसाना करता..
धन दौलत आठेच राहनार से
बर्बाद झायात सोनानी कोठी बांधता बांधता…!!
अंहकारी जिवनामा वाया गया
सध्दबुदी जास विकृतीले…
ताठ चालनार गर्वाथीन घंमठी
ताठपनमा गया स्मशान खाईले…!!
कर गोरगरीबले मदत
नको करू अन्याय दुसरावर…
फेडशी कोठ ऐवढ पाप
किडा पडथीन तुना अंगावर…!!
भले भले महारथी मातीमा गयात
शेवटे दोन थेंब नशिब नही व्हयना..
अंहकारी मानुस ऊघड डोया
दोन घास तुकडा करत उपाशी मरना…!!
मन्ह मन्ह करता लोभी
गर्वाचे घर खाले र्हास…
अंहकार डोयामा भरना
गर्वामा जमिनवर वाया जास..!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =३०-०३-२०२४
