जवारीना बोल
दोन पैसासना आशामा
जुवार मायले इसरत गया…
मोठी कमाईना चक्करमा
बयीराजा भ्रमीत झाता…!!
डोलदार भरदार भाग्य लक्ष्मी
जवारी मोतीमोल गोल दानानी…
व्हस घरले लक्ष्मीन आगमन
बयीराजाले आस दोन आनानी…!!
शरीरले मोठी लाभदायक
इसरी गया हालाकीले…
महागाईना जमानामा
मागनी मोठा पिकले…!!
गरीबनी धव्वी लक्ष्मी
गोड चवदार मातारानी…
उन्डाये पिक सुख देई
हिरा मोती रत्न मनी…!!
काया मातीन देन
धव्य सोन उबदार…
लेस पोटे दोन घास
जवारनी भाकर चवदार…!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =२९-१२-२०२३
