देवथून मोठा
देवथून मोठा अहिराणी कवीता
ज्येनी मेहनत भरे
आठे कोठारीना कोठा…
हाऊ कुणबीना बेटा
खरा देवथून मोठा………..1
तोले चाडाव्हर्नी मूठ
अख्खी धर्तरीनं पोट…
ईस्नू दुन्यादारी पोसे
हाई निरानाम खोटं………..2
पैरे वावरम्हा जीव
कोम उठी हुभा र्हाये…
आनी लबाडस्नी पोथी
बोट बर्म्हाकडे दाये………..3
नष्ट सुरुष्टीले करे
हाऊ भोलेनाथ भोया…
ईय्या तिरसुई त्येना
करे हंगामले गोया……….4
बर्म्हा…ईस्नू…महादेव
दिसें कुणबीमा माले…
तोच दत्तगुरु खरा
हाई धर्तीव्हर खाले………..5
येन्हा देवपणा देखी
देव आंतरम्हा बये…
भरे दुस्कायना कान
मन्हा कुणबीले सये……….6
न्हई समाधानी व्हये
करे पोशिंदाना हेवा…
रूप वामन्यानं लीन्हं
पाय डोकाव्हर ठेवा……….7
कवी प्रकाश जी पाटील (पिंगळवाडेकर)