अहिराणी कविता (Ahirani Poem) सत्तांना भोक्ता

सत्तांना भोक्ता Ahirani Poem

सत्तांना भोक्ता अहिराणी कविता


सत्तांना भोक्ता
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)

ज्या सत्तांना व्यापार करी ऱ्हायनात
त्यास्ना मांगे
सोताले सिध्द न करू शकणारा माणसें
धायी ऱ्हायनात
आशाना मारे व्हाय ऱ्हायनात

अरै मायबाप खळामा माळामा
घाम गाळीसन राबराब राबतस
मोलमजुरी करतस
या रिकामटेकडा पोरे
घरदार सोडीसन नुस्ताच उंडरावतस

मज रात व्है जास तवलगुन
माय दारना खेटे नी बाप वट्टावर बठीसन
पोऱ्यानी वाट दखत बठस्
हाऊ मात्र फुकटन् खायी पि
झिंगीझांगीसन बिनकामंन खेटस्

जवळ पोटले भाकर मिसळ नै ना
तवळ जगणं थांबी जास
रिकामा पोटे घास भरावाले
मायबापानाच हात पुढे ऱ्हास

अरे या पुढारीस्ना मांगे पळतस पण
तुमन्हा भुकनी कळ या सोसतस नै
तुमन्हामुळे या वळखावतस
पण तुमना कळवळा या दखतस नै

अरै भाऊस्वन या सत्ताना भोक्ता
ज्यांस्ना अस्तित्वान ठिकाणा नै त्या
सोताना घरदार सोडीसन
दुसराना घरमा गर्दी करी ऱ्हायनात
खोटानाटा चेहऱ्याले
मुखवटा लायी ऱ्हायनात

अरे या धवळा बगळा
त्यांस्ना घरनास्ले व्हैनात नै
त्या बरं तुम्हले कशा व्हतीन
शेवट पावोत तुम्हले
सतरंज्याच उचलाले लावतीन

अरे याना त्याना मांगे धायीसन
जिंदगी आपली खराब करू नाका
यास्ना फुकटना रामरामभी लेऊ नका
सोताले सिध्द करीसन
सोतान अस्तित्व निर्माण करा
मंगच तुम्हीन माणूस म्हंशात खरा

माय बै आपलंच मत खायीसन
श्रीमंत व्हनारास्ना मांग
मत देयीसन गरीब व्हनारा
पळी ऱ्हायनात
हायी ते भलती नवलाईनी गोटं शे भो.

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७