अहिराणी
बापन्या आवकाया अहिराणी भाषा
लेखक:-नानाभाऊ माळी
मी मन्हा मित्रानां गावलें गयथू!गाव धाकलसं से!कडक उंडायां लागी जायेल से!हेरले पानी नई!उपसा उपसावरी हुभा पिकले पानी भेटी
ऱ्हायन!पोट खेतीवर से!बिप्ता करी सवसार व्हडी मव्हरे धकी ऱ्हायन!त्यान्हया आवकाया दखी माले भी डोयालें पानी उंथ!वाटनं,’आपन सहेरम्हा पोटभरी खातस!निय्याम्हा चरतस पन हावू बाप पाह्यटे पोऱ्यालें उठाडी वावरम्हा जावानां तगादा लायी ऱ्हायना!’ कसं ते दखा.
“बाप पोऱ्यालें वावरम्हा जावानं सांगी ऱ्हायना
ऱ्हायना उठना रें,ओ बेरठ!कवलुंग आडा पडी ऱ्हाशी तू ?रातना बारा-एक वाजालोंग मोबाईलन्हा भुतडा चाफलत बठसं !हायी काने,ती काने पडी पडी!डोया फुटानी वाट दखतं बठस!मोबाईलम्हा बोटे चिवडत बठसं!चव ना धव त्या वाच्चायलें!निस्ता येडाचाया दखत बठसं बाट्टोड!तुले रातले सांग व्हतं ना!उंडाया चटकी ऱ्हायना!हेर खल्ली तयलें भिडी जायेल से!हेरन्हा खोल दल्लाम्हा बारीक बुरीक मुत्र्या झिरपा चाली ऱ्हायनात!त्या हेरमा पडी
ऱ्हायनात!खोल दल्लाम्हा पानी गोया व्हयी ऱ्हायन!गुढघ-कंबर पानी संगयेसं व्हयी!उपसा काढी काढी!उंडायांनां हुभा पीकलें पानी भरनं पडी ऱ्हायन!उंडांयी बाजरी-भुईमुंगनं भरनं मुकलं से!पानींनी मोटर कुत्रींमायेक पानीन्हा मांगे लटकस!१५-२० मिटांम्हा हेरनां दल्लान्हा ठाक लागी जास! तू सक्कायं पाहायरें मयाम्हा जावानं सोडी आजून खाटलं मोडी ऱ्हायना!
तथा हेट्या दख तू!उगता यांय तुन्ह थोबडं दखी हासी ऱ्हायना! निकायज्यानं मायेक निस्ता आडा पडेल से!मन्हा जिवडालें निस्ता घोर लागी जायेल से!रात-दिन हेर वावर करी जिवडालें शिनबागडं यीं जायेल से!जीव किद्रेलंना मायेक व्हयी जायेल से!तथ हुभं पिक बयी ऱ्हायनं!आथा तू जीव बायी ऱ्हायना!दारसे खाटलं टाकी लेवो!आडाधट पडी ऱ्हावो!से का काय जीवलें घोर!
आंगम्हा काम ऱ्हायन नही!माटीम्हा आंग भरत नही!घाम नींघतं नई!पोटभरी खात नई!आथ-तथ आवलं चावलं खायी येंवो!चटोरी जीभलें घरनीं शाक भाकर आवडत नई!२०-२२वरीसन्हा तरना ताठा पोऱ्या!कशा बोंबीलन्हा मायेक व्हयी ग्या!आंगम्हा रसचं नई ऱ्हायना!हाडके हाडके मोजी लेवो तुन्हा!जशा काय
आंगन्हा पिंजरा व्हयी जायेल से!मुसड काय रंगीं ल्हेसं!डोकावर झिपाट्या काय वाढायी लिदातं!

आम्ही ते बैल व्हयी राबी ऱ्हायनूतं!आम्हनां जमाना चालना ग्या!आथा तथा झडा मारी मूरी आठलोंग भिडी गवूतं!तू शिकी सवरी मव्हरे जाय!नही ते मंग तुन्हा हाल कुत्रातीन भी बेहत्तर व्हतीन बरं?पहिले कुमचाडी पानी पडे!वल्लानंन्हा वावरे गरायी जायेत!पानीम्हा मुरायेल माटी इघरी इघरी एकजीव व्हयी जाये!माटीम्हायीन पहिरेलं बी उफडायी वर यें!निय्येगार पिकं बकरीन्हा बच्चांमायेक वार्गीवर नाचतं ऱ्हायें!हाद्या-कुद्या मारे!खेतकरी न्हा जिवडालें निचितवार जप लागी जाये!
कोयपनी व्हयनी का पिकं निस्तदांडनां मायेक उफडायीं हुभ ऱ्हायें!हुभा पीकम्हा घुसालें जीव भ्याये!दखता दखता दसरा-दिवाई यीं जाये! गावंआंगे खया तयार व्हवालें लागी जायेत!बाभुईना काटास्ना भर खयान्हा शिवाडांनां आंगे पडेतं!खया सवारी-सुवारी,वडांग व्हयनी का खयें शेनवरी सारी लेवूतं!शेनन्हा मगमगातं वास मनल्हे हुभारी देत ऱ्हायें!मंग वावरमां पिकें कापी-कुपी गाडाम्हा भरी खयान्हा रस्ते लागेतं!तठेंग बठ्ठा खयान्हा गोमडा सुरु व्हयीं जाये!कनसे बैलेस्ना पायंखाले,पायेतवरी कुस्करायी-कास्करायी पिस्टा उडेतं!पायेतनं बठ्ठ बदगं गोया करी,
उडायी-वाडायी सोनान्हीं रास गाडाम्हा भरी घरलें येंतं ऱ्हायें!ते खरं सोनं व्हत!

आते पानी पाहिजे तितला पडत नही!एखाद दुसरं शेंर येस!मूती -माती चालनं जास!वार्ग उडत ऱ्हास!वर पानी नयी!जिमीनम्हा मुरात नही!हेरम्हा जीरत नही!धान्यन्ह्या कंनंग्या भरतीस नई!आते बठ्ठ कुत्रानं लेव देव व्हयी जायेल से!त्याम्हा तुंनंसारखा निकमावू जलमलें येतंस!करक्कबन काम करानं नई नीं शप्पन मोठं दखतंस!
आरे उठना रें!तथी झिरपा गोया व्हयी हेरम्हा उपसा पूर्त पानी गोया व्हयी गें व्हयी!आंगम्हा काम नयी भडवानं! रात-पाह्येटे उठी कामनीं कर्तूक नयी!लिखा पुसानीं बोंब पडतं नयी!मव्हरे कसं व्हयी रें तुन्ह?वावरे इकी इकी खासी का तू ?बापन्या बिबता ज्या पोऱ्यालें दिखतीस!तू सोताना कमायीथुन उजाये पाडस!तू काय आम्हना काठीनां आधार व्हसी!आक्सी आयतं खावानीं सवय लागी गयी!तू काय कमाया करसी रें बाट्टोड!… “
मित्रान्ह्या आवकाया हिरदले उक्कय फोडी ग्यात!मी एखलाचं रडी लिध!कसी जिंदगी से गावकडे? आपुन सुखी सेतस शेतकरीनां जीववर सुखी सेतंस!त्या राबी राबी भक्या ऱ्हातसं!
नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धूळे
ह मु हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२७ मार्च २०२४
(आज धुयालें से)

