खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा

खान्देशी जत्रा

शिरपूर खंडेरावनीं जत्रा लेखक नानाभाऊ माळी खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा

जत्रा कोणी ऱ्हास खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा

जत्रा डोयानी ऱ्हास!जत्रा पोटनी ऱ्हास!जत्रा मनन्ही ऱ्हास!जत्रा पोरे- सोरेस्नी,धल्ला-पल्लास्नी ऱ्हास!येनारा पाव्हना-पयीस्नी ऱ्हास!जत्रा
इकनारस्नी ऱ्हास!जत्रा लेनारस्नी ऱ्हास!पोट-पाट,येयन्हा येव्हारनीं ऱ्हास!जत्रा हासी खुशीनीं ऱ्हास!खिसा खाले करी,आनंद दि सरी जास!इकनारा-लेनारा आपापला गावें चालना जातंस!जीवनी जत्रा याद ठी चालनी जास!वरीसभरना साफ्टा दि जास!शिरपूरन्ही जत्रानीं आठनुक ऱ्हायी!डोयांमव्हरे फिरत ऱ्हायी!काल्दीन आम्ही नवरा बायको जत्राम्हा फिरनूत!हासी खुसी फिरनूत!गर्दीम्हा वाकडा-तिकडा व्हयी फिरनूत!जीवनी जत्रा व्हयनी!आठनुकन्हा साफ्टा संगे ल्ही रस्ते लागनुत!

जत्रा मानसे गोया करानं ठिकान

यात्रा आनी जत्रा दोन्ही मानसे गोया करानं ठिकान ऱ्हास!वरीसभर राबी राबी किद्रेलं जिवलें आनंनं,सुखूनन्हा दोन-चार दिन भेटानं ठिकान ऱ्हास!कटायेल,थकेल जीवडालें बदल जोईजे ऱ्हास!तरतरी येवागुंता,लेवा- देवागुंता वरीसम्हा एकडाव गाव जत्रा ऱ्हास!जत्राम्हा जे नई तें भेटतं ऱ्हास!हाऊस मौजनीं कोंती भी चीज वस्तू भेटतीस!सवसार उपयोगी बट्ठया वस्तू भेटतीस!वरीसभर कटायेल जीवडा निव्हायी जास!जीवनी हावूस भागी, मज्या करी जत्राम्हा आनंद लेतं ऱ्हावो!लोक गर्दीन्ह अशा ठिकानलें मंग जत्रा म्हंतंस!

शिरपूरनी खंडेरावनीं जत्रा

आते शिरपूरनी जत्रा भरेलं से!अबब काय गर्दी उस्मयेल से हो!बापरे-बाप कितला कितला दुकानें सेतस!वाला वाला दुकानें सेतस!डोया फाडी निस्ता दाखतच ऱ्हावो!हायी शिरपूरनी खंडेराव महाराजनी जत्रा थेट पुनी फाइन तें शिवराती पावूत सुरु ऱ्हास!गर्दीम्हा बठ्ठा भेटतंस!हौस्या, नवस्या,गवस्यास्नी भी जत्रा ऱ्हास!या जत्राम्हा जीवनी हावूस भागाडालें येल ऱ्हातसं!आम्ही भी काल्दीन आम्न्ही पुरी हावूस भागाडी लिधी! काल्दीन जत्राम्हा निस्ता बहिखेलंनां मायेक इबाक-तिबाक तंगडा तानत भवडतं ऱ्हायनुतं!गर्दी टायी-टुयी भवडत ऱ्हायनुतं!डोया नेम्मन हुगडी कामन्या जिन्नसा धुंडत ऱ्हायनुतं!गर्दी काय म्हनो अबब!रातले सोता तिरपा-तारपा व्हयी,आंग चोरी-चारी गर्दीम्हा खांद्या उडावत, मुसड तानी भवडतं ऱ्हायनूत!छातंडा जेवना-डावा बाजूलें करी, वाकडा तिकडा व्हयी मव्हरे सरकत ऱ्हायनूत!

वस्तुका लेत ऱ्हायनुतं

वस्तुका दखी-दुखी,उलट्या-पालट्या करी इकत लेत ऱ्हायनुतं!एखादा धल्लानीं चुकीस्नी ध्यान नई ऱ्हायनी नीं तें एखादी धल्लीले धक्का मारी मव्हरे निंघी जात ऱ्हायना का धल्ली बोंब मारी गाया देस!कशी तें दखा तुम्ही,’कारे रानम्या!मुडेल मुसडानां!डोयालें खल्ली खड्डा पडी ग्यात का तुन्हा? का फुटी ग्यात तुन्हा?दिखात नई का तुले? बाई मानोस दिखत नयी तुले?’ धल्ला बिचारा खिसाना व्हयी,खाले तोंडं घाली जत्रानी गर्दीम्हा काना-कुना व्हयी निंघी गुडूफ व्हयी जास!पोऱ्या-पोरी भी काय कमी नयी सेतीस!तस्याच करतंसं!जत्रानी मज्या मन नव्व करी जास!गाले गुलाब फिरायी जास!हुरहूरी लायीं जास!खुरखुरा लायी जास!यादनी थैली भरी जास!

जत्राम्हा मज्या करी

वज्जी जीव निव्हायी तवलोंग जत्राम्हा मज्या करी लेवानीं!मन गरास तवलोंग नाव निव्हायनीं ऊर्जा भरी आखो आपला रस्ते लागी जावानं!हिरदम्हा,मनम्हा वरीसभरनीं हवा भरी लेवो!नव्वी हवा भरीस्नी मनन्हा टायरलें मव्हरे वरीसभर दल्ला-खल्लास्मा उधयेतं ऱ्हावो!तंगाडतं ऱ्हावो!वरीसभरनी चिंता मिटी जास!मनन्ही आमन्या मिटी जास!मन रिपेर-रापेर करी तंगाडतं ऱ्हावो! जत्राम्हा जे नयी तें बठ्ठ भेटस!दुकानें दखत भवडत ऱ्हावो!कोल्ल-वल्ल बठ्ठ भेटतं ऱ्हास!जत्राम्हा धाकली पोर फाइन तें धल्ली पावूत,धाकला पोऱ्या फाइन तें धल्ला पावूत लागनाऱ्या बट्ठया वस्तुका भेटतीसं!कामन्या चिजा भेटतीस!पैसा फेकत ऱ्हावो!जीवनी जत्रा करी मस्तंग मज्याम्हा भवडत ऱ्हावो!इकनारान्हा धंदा व्हस!लेनारन्ह मन गरास!दोन्हीस्न पोट भागस!


जत्राम्हा हार परकारन्हा पायना

जत्राम्हा हार परकारन्हा पायना दिखनात!सर्कस,‘मौत का कुंवा’ सारखा गंजज खेय दिखनात!एकेक खेय तें समजालें मुश्किल व्हतात!पायना गोल-गोल खाले-वर फिरी ऱ्हायंतातं!तव्हयं उज्जी डवडव जीव करी ऱ्हायंता!पन पायनाम्हा बठानी मज्या न्यारीच व्हती!एक थीन एक खेय भारी व्हतात!जत्राम्हा आते कोंता भी खेय दिखतसं हो!येडांगतं डोया तानी निस्ता दखत ऱ्हावो!गोयम्हा नं गोयम्हा करी खेय दखत बठो!

जत्राम्हा काही म्हायी जिन्नसा सेतीस!वस्तुका सेतीस!घर सवसारन्ह्या चिजा सेतीस!इस्टीलन्हा,लोखंडन्ह्या वस्तुका तावा,कढई,गायन्या,झारा, सांडसी, पक्कड,पावसी!टिकली बांगडीन्ह्या वस्तू भेटतीस!खेतीना-इया, कुऱ्हाड, कूस्सा, कुदायी, टिक्कम-पावडी,काय नयी तें बठ्ठ भेटस!

जत्राम्हा खावलान्या हाटिले

खावलान्या हाटिले तें काय सांगो!गंजज येर पाठे येर लायेलं सेतीस!मन-मन सेतीस!काय खावो नं काय नइ इतल्या सेतीस!गोडशेव, जिलबी, कचोरी, भजी, चाट, पोहे, खारशेव आखो गंजज!दखता-दखता,खाता खाता जीभल्या चाटी पोटनी मज्या व्हयी जास!हाटेलम्हा घुसो खायी-खुयी मन गरायी लेवो!

उसना चरखास्ना घुंगरू छुनुक छुनुकं आवाज करी निस्ता कांठयी बसाडी ऱ्हायतातं!बरफ टाकेल उसना रस काचनां गल्लासम्हा फेस्कुटायी वर यीं ऱ्हायंता!व्हट लावताच घिटिंग-घिटिंग
गयान्हा नयाम्हा उतरी ऱ्हायंता!पोटमा उतरताचं निस्त गारेगार वाटी ऱ्हायंत!

आठनूकनी शिरपूरन्ही जत्रानी

आठनूकनी शिरपूरन्ही जत्राम्हा काल्दीन गयतूतं!धल्ला व्हयीस्नी भी तरना ताठांमायेक फिरनूत!वय चोरी फिरनूत!वयखी पायखी नजरे आड करी फीरनूत!जीवनी जत्रा करी फिरनूत!हिरदम्हा वरीसभरनां साफ्टा लिधा!मव्हरे १२ महिना साफ्टा थोडा थोडा करी सरावानां से!पुनानां रस्ते लागनूत!

नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे
ह.मु.हडपसर,पूणे-४११०२८

खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा
खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा

Khandesh Vahini Ahirani Song

अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024 अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४ अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना अहिराणी कवीता पक्षांतर