कथासंग्रह भवरानं प्रकाशन
“भवरा”हिरदनां खोल दल्लान्हा बोल
नानाभाऊ माळी अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024
अहिराणी बोली कथासंग्रह भवरानं प्रकाशन
परोंदिन २ मार्चना दिन माव्यांलें डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना अहिराणी बोली भाषाम्हा लिखित “भवरा” कथासंग्रहानं प्रकाशन व्हयन!त्यास्नी जनम भूमी धुये से!धुये त्यास्ना हिरदम्हा बठेल से!धाकल्पन्ह्या बट्ठया खाना खुना,याद ताज्या व्हयी संगे लयी फिरी ऱ्हायनात!त्या ऱ्हायेल फासीपूल तें मिलन्हा भाग जीवन जगानी शक्ती सेतस!पुस्तक प्रकाशन धुयालेचं व्हयन!भवरा कथासंग्रह हिरदना खोल दल्लानां बोल सेतस!निर्मय मनन्हा बोल सेतस!खल्ली कायेजथुन लिखेलं सत्त्यांना बोल सेतस!कयकयनां बोल सेतस!
भावरा कथासंग्रहम्हा १२ कथा
भावरा कथासंग्रहम्हा १२ कथा सेतीस!कथाबीज आशयलोंग भिडस!
कथा रसिक,वाचक मनलें पक्क धरी ठेवतीस!”डॉ. कोटणीस की अमर कहानीयाँ”गतं डोया हुगाडानं काम करतीस!हासी खुशी डोयालें पानी काढतीस!खोटा-नक्टास्लें गाव दर्जावर टांगांनं काम करतीस!हावू कथासंग्रह डॉ.दुसाने सरस्ना अनुभूतीना उमाया से!निमायालें उमेद दि कोमायेल से!बिमार मानोस्न शरीर कापीकुपी, जोडी-जाडी हुभ करनारा या डॉक्टर सोता गह्यरतसं!डोया वल्ला करतस!
मानोस्किना गह्यरं सत्यान्हा ऱ्हास! नाक समोर चालनारन्ह मन सच्च ऱ्हास!१२ कथा सच्चायीनां रस्ता दखाडानं काम ऱ्हातीस! अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन
अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन प्रकाशन समारंभलें अहिराणी साहित्यिक
प्रकाशन समारंभलें अहिराणी भाषाना गंजज लाल येल व्हतातं!अहिराणी भाषा ग्यानी बाप लोके येल व्हतात!भाषाले इचार बोघनाम्हा उकई उकई निस्त आस्सल तूप काढनारा भाषा हालवाई येल व्हतात!अहिराणी भाषाना पालखीना भोई येल व्हतात!धुरकरी येल व्हतात!त्यास्ना पायवर फुले व्हायी पूजो,डोकं ठिसस्नी आशीर्वाद लेवो अश्या साहित्यिक येल व्हतात!
सुभाषनाना आहिरे येल व्हतात!जगदीश दादा देवपूरकर येल व्हतात!डॉ.सदाशिव सूर्यवंशी सर येल व्हतात! डॉ. दिलीप पाटील सर येल व्हतात!डॉ. वानखेडकर सर येल व्हतात!बापूसाहेब पिंगळे सर येल व्हतात!एम के भामरे बापूसाहेब येल व्हतात!आप्पासाहेब विश्राम बिरारी सर येल व्हतात!भाऊसाहेब प्रकाश पाटील पिंगळवाडेकर येल व्हतात!आप्पासाहेब रमेश बोरसे सर येल व्हतात!बेडीस्कर सर येल व्हतात!गुलाब मोरे सर येल व्हतात!कवी कासार येल व्हतात!एम एम पवार सर येल व्हतात!अशा आंखो गंजज नावे सेतस!या अहिराणी मायना पालखीना भोई,पक्का भाषाभिमानी ‘भवरा’ कथासंग्रहनां प्रकाशनलें येल व्हतात!

डॉ.दुसाने सरस्नी प्रास्तविक मांड
कार्यक्रमन्हा मेढ्या डॉ.दुसाने सरस्नी हिरद मोके करीस्नी प्रास्तविक मांड व्हतं!त्या धाकल्पनम्हा लयी गयेथातं!प्रास्ताविकम्हा डोकावर बत्ती धरीस्नी,कुल्फ्या इकीस्नी शिकी सवरी उभा ऱ्हावानां जीवनार्थ नेम्मन समजाडी सांगा व्हता!’सत्यानां, सचोटीन्हा रस्ते चालतांना लाज वाटालें नको’ असा संदेश दिन्हा जीवनानुभव आदर्श रस्तान्हा मार्ग समजाडी सांगा!
१२ कथा हासी खुशीसंगे आंसू काढतीसं!हासी हासी,हिरदन्ह दबेल दुःख नेम्मन दखाडतीस!अहिराणी भाषान्हा भाष्यकार आदरणीय सुभाषनाना आहिरे सर, डॉ.सदाशिव सूर्यवंशी सर,डॉ.वानखेडकर सर,कार्यक्रमन्हा हेड मुकाडदम आदरणीय डॉक्टर दिलीप पाटील सर यास्नी लेखकन्या कथा आनी लेखक बद्दल एक एक पंधा हुगडी सांगातं!डॉ. दुसाने सरस्ना आत्मिक बोल उलगडी सांगातं!कव्हयं हासू उनं!कव्हयं आंसू उनात!मन वल्ल व्हतं ऱ्हायन!लेखकनीं उमेद,येल परिस्थितीलें तोंडं दि मव्हरे जावानीं हिरदलें भिडत ऱ्हायनी!लेखकना मोठा भाऊस्न(नाना) लिखित बोल मायाताई यास्नी वाची दखाडं तव्हयं डोयाम्हा आंसू डबकी उंथात!डॉक्टरस्ना त्यागी सभाव हिरदलें भिडना व्हता!
कथा हिरदल्हे थंडागार फवारा मारत ऱ्हातीस!
डॉक्टर दुसाने सरस्न्या १२ रंगन्ह्या १२ कथा हिरदल्हे थंडागार फवारा मारत ऱ्हातीस!न्यामिना संदेश दि कथा बीजलें आशयलोंग तंगाडतं ऱ्हातीस!भवरा मानोसन्हा मनन्ह नेम्मन औसद से!पानींना थंडागार फवारा से!उबगेलं ताता बयेतावर पानींना शीतडा से!कव्हयं हिरदलें गुदगुल्या करतीस!कव्हयं गयान्हा हुंडूक दाटी येस,डोया वल्ला करत ऱ्हातीस!भवरा गोल फिरी फिरी अर्थ सांगी लुंडकी जास!धुरते धुरते डॉक्टर उमजत जातंस! अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशनमार्च 2024
डॉ दुसाने सर अहिराणी साहित्याम्हा आभायथीन मोठ काम
मेडिकलन्ह्या ०७ डिगऱ्या शिकेल डॉ दुसाने सर अहिराणी साहित्याम्हा आभायथीन मोठ काम करेल से!वाची दखावर अहिराणी भाषानां जुन्नाट अस्सल सोनानां सबद मन गरायी टाकतस!अहिराणींना खान्देशी लाल डॉ ज्ञानेश दुसाने सरस्नी आपली नाय अस्सल अहिराणीन्ह्या कथास्थून पक्की जोडी ठेयेलं से! अहिराणी भाषाम्हा इतलं कायेजथुन लिखणारा पहिला डॉक्टर व्यक्ती सेतस!
जिंदगी भवरांगतं से!गोलगीटिंग से!गोल गोल फिरायी,हासी कुदी लेवो!आश्या कथा सेतीस!डॉ.दुसाने सर नेम्मन कथाबीज पकडतसं!नस पकडी गोड गुलाबपानीनं इलक्शन देतंस!हसता हसता डोयाम्हान पानी भी काढतसं! ‘टेन्शन नयी लेने का’ म्हंतंस!पडमथ्यास्लें अनुभवनां शिंगडावरी उचली फेकतसं!येडाचाया करनारस्लें इचार रूम्हनावरी बामकाडी काडतस!आस्सल अहिराणी कथा टाकोरा देती सुधरानां मार्ग दखातीस!
उत्तर महाराष्ट्र इद्यापीठम्हा या कथासंग्रहनीं निवड व्हवो
भाषा येव्हार आनी जित्त ऱ्हावानी वयख से!भवरान्ही भाषा खान्देशनीं वयख से!डॉक्टर दुसाने सरस्नी सबदअर्थ कुदायीवरी खंदी खंदी, उकरी उकरी भवराम्हा टाकेल सेत!भवरा फिरत ऱ्हास!रसिक फिरत ऱ्हास!मज्यानं, न्यामीनं सप्पन दखाडी टेन्शन नई लेने का म्हनतीस!कथा आंबानीं कोंयींगत सेतीस!चोखतचं ऱ्हावो!तशा कथा वाचतचं ऱ्हावो!मनन्ही आमन्या पुरी व्हत नयी!मन भरत नयी!
आसं खुशीन औसद दिस्नी भवरा फिरत ऱ्हास!डॉ. दुसाने सरस्ना पहिलाचं पन रसिक वाचकस्नी नस वयखी लिखेल से!भवरा न्यामिना कथासंग्रह से!आदरणीय डॉ सरजी आपले शुभेच्छा आनी आरस्तोल करस!मव्हरे उत्तर महाराष्ट्र इद्यापीठम्हा या कथासंग्रहनीं निवड व्हवो याचं शुभेच्छा!
… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०४ मार्च २०२४