अहिराणी कविता (Ahirani Poem)

बोल सत्याना अहिराणी कविता

बोल सत्याना

लेखणी मन्ही धारदार
कधयच कोनले नही कयनी
गद्दार वाचनारना ह्रदयीमा
बोल टोचतस अंतर मनी…!!

लेखनी मारा तिरदार
तिष्ण शब्दसना अघाध…
धोकेबाजनी महिफील आठे
आग लाईसन झायात  सावध…!!

लेखनी नी कडक मांडणी
तेनावर पन बयनात…
कितल जहर तुना मनामा
आज माले कयनात…!!

लेखनी तशी साधी मन्ही
घाईघाईनी मांडनी…
वाचनारले कयना भाव
मस्त ति शब्दसमा देखनी…!!

लेखनीना बाणा असा
मजबूत कणखर भरदार…
बोल मांडा सत्य परिस्थितीना
लिखाले पेन चालस सरसर…!!

लेखनी मन्ही धारदार
बोल सेत वर भरारीना…
व्हनार नही बदल
मनमाईन शब्द निंघतस सत्याना…!!

Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
            दिनांक =१७-०३-२०२४

कोनीच कोन नही

कोनीच कोन नही…अहिराणी कविता

आयुष्यभर सर्वासना करता
दिन रात पाणीगत राबना…
ऊना टाईम जावाना शेवटी
सरनवर एकला बयतत रयना…!!

नात निभाळामा झाया व्यस्त
माणुसकीचा धर्म पायत ऊना…
कसा झाला रे अंत तुना
शेवटले परका व्हयना…!!

वापर कया तुना स्वार्थना करता
अडचणमा कोणी काम नही पडना…
कसा गोतावळा मोह मायाना
तिरडीवर एकटाच निंघना…!!

चार खांद्याची कयी अपेक्षा
तुनाच प्रापर्टीना करता लढत बसनात…
स्वार्थ पुरा व्हताच मतलबना
वाजत गाजत स्मशानमा लयनात…!!

तुना अंगाले हात लावात त्यासनीच
त्यासन आंग साबणघाई धोय…
जगल देखाडा करता तरी
दहा दिन पन दु:ख नही पाये…!!

दिखावाना दोन अश्रू निंघानात
रूसी फुघी पोटले दोन घास खादात…
मराना मांगे कोनी मरत नही
तुनाच देख तुले बेइमान झायात…!!

PSI विनोद बी.सोनवणे (धुळे)
             दिनांक =१९-०३-२०२४