अहिराणी कविता जन्म माले लेवू दे
अहिराणी कविता
जन्म माले लेवू दे
दि.५/२/२०२४
तू जसं जगं देख तसं माले भी देखू दे
नको मारू व माय माले जन्म लेवू दे
नको करू गर्भपात माय तू
इतली कशी कठोर मननी झायी तू
या जग दुनियामा माले येऊ दे
नको मारू माय माले जन्म लेवू दे
हुंडा लागस मन्हीन मना त्रास वाटस का?
झरा तुना मायेना मन्हीन आटस का?
दादाना राखी करता तरी माले येवू दे
नको मारू माय माले जन्म लेवू दे
तू बहीण तू कन्या तू भी एक स्त्री से
तू कालदीन जठे होती तठे मी से
तू जसं नातं जपं तसं माले भी जपू दे
नको मारू माय माले जन्म लेवू दे
तू देख माय मी परत येवाय नही
भाग्य कन्यादाननं तूले कधी भेटाव नही
डोया भरी येतीन तूना पदर माले व्होवू दे
नको मारू माय माले जन्म लेवू दे
अहिराणी बोली अनुवाद
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३

1 thought on “अहिराणी कविता जन्म माले लेवू दे”
Comments are closed.