कर्ज बापनं मरण ahirani language learning
७ व अ.भा.अहिराणी साहित्य संमेलन धुये ~
ता २५~२~२०२४
स्वरचित कविता से
विषय = बापनं मरण
शीर्षक =कर्ज
आज मना बापनां डोयामां
सगळं आभाय भरेलं व्हतं
भाऊनां हातसनी मूठम्हां
आते नुस्ती राखच उरेल व्हती,,,
बापनं मन ऱ्हास आभाय
मायसे धरती राणी
तठेच लिखावस तेस्नी
दुःखसुकनी कर्मनी कहाणी,,,
लालकायानां संगे हातमानी पांभर
वावरम्हा च्यारीमेर फिरस
अन जव्हयं खाई जातस कोऱ्या
तव्हयं याना जीव खालेवर करस,,
कायी माटीनां गर्भम्हा
जसं लावस हाऊ रोप
नही फुटस तेले डीर
तसं मात्र उड्स यानी झोप,,,
फाटी जास यानी कुडची
तुटी जातीस बाह्या
बिचारी शेतकरीनी बायको
दिनभर करस माटीमा आवकया,,
त्यानं डोयानं पानी
जसं घामा जिरावस
सोना सारखा माल तेना
कवळी मोल इकावस,,,
सरकार म्हणस जगनासे पोशिंदा
दरसाल व्हस याले खतबीनां वांदा
असा करस हाऊ घरघाली धंदा
म्हणून लावा यानी गयाले फाशीनां फदां
रजनी बी पाटील अंमळनेर
कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन