७ व नेरन्ह अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी साहित्य संमेलन

नानाभाऊ माळी

पांझरा नदीन्हा काठे सई बहीन भेटी!
देर-जेठ भाऊ-भासा,डिक्रा मन्हा भेटी!
              
मन्ह तालेवर गोत,जीव निव्हायी भेटी!
मन्ह तालेवर गाव,नेर राम पाह्यरे उठी!
                   
माय पालखीना भोई,डोये गये भेटी!
सुख-दुःख जिंदगीनीं कविता रे आठी

नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन भरी ऱ्हायन!पांझरा नदीनां काटलें नेर गाव से!धुये तालुकाम्हा से!जुनं कायम्हा ऊसनां खेतीनं गाव व्हतं!वऱ्हा अक्कलपाडा धरण से!!धरणन्हा खाले नदीलें लायीस्नी कांदा, गहू, मक्की दिखी ऱ्हायना!कांदांखाले भुईम्हा तोंडं दपाडी वर निय्यीगार पात वार्गीवर नाचतं दिखी ऱ्हायनी!मक्की ते तट व्हयी उभा दिखी ऱ्हायनातं!हरभरा,गहू हुभा दिखी ऱ्हायनात!आकलाड,मोराने, लोणखडी,चवगाव,कुसूंबा, भदानें,भटाई, खंडलाय, चिंचखेडा, अंचाळे या बठ्ठा गावें आंगे पांगे आपलाच जोजार व्हडेलं दिखी ऱ्हायनात!नेरलें २५फेब्रुवारी २०२४ ना दिन अहिराणी साहित्य संमेलन व्हयी ऱ्हायन!बठ्ठा येणार सेतंस!ज्ञाननं अक्कलपाडा भरेलं से!माय अहिराणीलें पांझरा भेटी!गये पडी! ७ व नेरन्ह अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी मायन्हा लेकरे गोया व्हतीन!लिखेल पुसेल वाची दखाडतीन!कोनी खान्देशन्हा इतिहास सांगी!कोन खान्देशन्ह्या प्रथा सांगी!कोन परंपरा सांगी!कोन सन वार सांगी!गुडीपाडा, आखाजी सांगी!कोनी डफड वाजी!कोन डांक्ख्या वाजी!खान्देशनां जेठा-मोठा कवी,लेखक, विचारवंत गोया व्हतीन!अहिराणी साहित्य आनी भाषानां गौरव करतीन!लेखी,वाची बोली बाली कायेजलें भिडाउतीन!

मधाय,गोड साखर तूप लोणीम्हा
बुडायेल अहिराणी भाषा मायंगत से!माया मया लावस!येची टुची पोरेस्लें गोया करी,आपला संस्कार शिकाडस!त्यांगुंता बठ्ठा आंडोर-आंडरीं नेरलें यी ऱ्हायनात!भेटी ऱ्हायनात!अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सर बठ्ठास्लें नेरलें न्युत दि बलायी ऱ्हायनात!

मंग.
पांझरा नदीना काठे!नागपूर सुरतनां रस्ते!नेरले व्हाडातं ताटे!बठूत पाठे, मायलें भेटा साठे!कोनी भरेलं पोटे!कोनी भुक्या पोटे!दूर जायेल आठे!कोनी जायेल तठे!कोन पांझरा काठे!कोनी बठेल खाटे!कोनले गह्यर दाटी!कोनी मंशा फिटी!बठ्ठा इतिन बाजार हाटे!माय पांझरानां काटे

….कोन कविता उखली!कोन इतिहास उखली!कोन गवराई उखली!कोन आखाजी उखली!कोन गुलाबाई उखली!लेखक, कवीस्ना बजार फुली जायी!मज्यानी गंम्मत ऱ्हायी!नेरनीं पांझरा व्हायी!नवाजेल कवी इतिन!नवाजेल गझलकार इतिन!नेरन्हा हिरदम्हा ऱ्हातीन!मायीन्हा मया फुली!कवीन्हा गया खुली!इतिहास राज खोली!माय अहिराणी बोली!वावरम्हा आउत चाली!वखरी,नागरी,पह्यरी कोयपी वावर वली,निय्येगारं पीक कविताम्हा फुली!



आयतवारे २५ फेब्रुवारिले संमेलन रंगीं!…. मंग…

नेरनीं वल्ली भुई!तठे भेटी फुई!भाची लुगडा धोई!धोनं जायी डोई!भरी जायी वही!नेरलें कायेजन्हा भाऊ-बहिणी भेटतीन!तठे
कोनलें कुस्मरं भेटी!कोनलें खुडा भेटी!तोंड झनका उठी!तिखट-गोड बठ्ठ कालायेलं काला मोडी लेउत!आनी नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनलें जाऊत!
जय अहिराणी!जय खान्देश!

नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि धूळे
(ह.मु.हडपसर,पूणे)
दिनांक-२३ फेब्रुवारी २०२४

कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोला आहिराणीना जागरसाठे नेरले चला अहिराणी कवीसंमेलन Ahirani Blog ७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन