मायबाई आहिराणी
देखा धन्य आज दिन, नेरले मोठंपन उनं,
आहिराणीम्हा बोलतीन, बठ्ठा खांदेशी जन.
मायबाई अहिराणी, कशी सुलावनी झायी.
चर्चा लेकरस्नी देखी, थोडी हरकाई गयी.
म्हने भिती नही आते, सरी ग्यात दिन बुरा.
मन्हा गनगोतनी आते, हातम्हान हात धरा.
उच्छाव नी संमेलनं, यातं व्हतज -हातीन.
मन्हा लेकरं खुशीमा, मन्हा गुनच गातीन.
आते लिखा वाचा बोला, अहिराणी खरोखर.
द्या खिसाले चाट थोडी, आना पुस्तकं घरोघर.
डंका वाजू द्या चौफेर, आते मने धरा ध्यास.
राजभाषा व्हवा लोंग, नको वाटो गोड घास.
© प्रा.बी.एन.चौधरी
देवरुप, धरणगांव.




