ग्लोबल खान्देश महोत्सव

ग्लोबल खान्देश महोत्सव


ग्लोबल खान्देश महोत्सव

चला चला चला तुम्ही कल्याणले चला….
सर्वासले शे चार दिनन चुलाले निवत तुम्ही कल्याणले चला..

शेतकरी माय बापले हातभार लावाले
गुयनी  जिलबी गोडशेव  फाफडा खावाले.
वडा पापड शिया कुलया लेवाले
वरण बट्टीना फुरका व्हढाले
खान्देशना कलाकारस्नी करमणूक दखाले

रशी भात भजी पापड
पुरण पोई संगे खीर भारी
आम्हनी खान्देश खाद्य संस्कृतीशेच न्यारी

पाटोडी रस्सा बाजरीनी भाकर
वांगण भरीत कयणानी भाकर
खापरवरणी पुरण पोई तोंड जणू साखर

एक वरीसना  सारसामन लिज्यात
गहू बाजरी ज्वारी मुग मटकीबी लिज्यात
काया मसालानी भाजी खायज्यात
गाण वाजाणा काम भाऊ बहणी करतस
मंग समदा खान्देशीं धनगोत गोया व्हतस
तठे समदासणा कला गुणस्ले वाव देतस

ग्लोबल खान्देश महोत्सवाले भेट दीज्यात
अहिर भाऊ बहीनिसणी जपले खान्देशी संस्कृती
ग्लोबल खान्देश महोत्सवमा तूम्ही दखाले इजज्यात


सविता पाटील मुंबई