माय इंदिरा
भारतनी वाघीण म्हनीसन
अशी जगमा वयख कयी..
खंबीर नारी इंदिरा गांधी
पहिली बाई पंतप्रधान झायी….
जवाहरलाल नेहरूनी लेक
देशना ईचार त्यासना नेक
व्हती मर्दानी कडक कायदाले
चाले नही कोनीच नोकझोक…!!
लिनात निर्णय ठाममते
झुकाड समधा जगले..
कठिन परिस्थिती दिखताच
लाई आनीबानी देशले…!!
हिंमतनी व्हती मजबूत
फायटरवर हवमा उड्डाण लिनी..
कनखर नेतृत्व महिला नारीन
पहिली काँग्रेसनी महिला अध्यक्षा बननी..!!
गोरगरीबनी माय म्हनेत
असाक्षरता गरीबी दुर कराले…
बर्याच योजना राबाडीसन
जनताले संदेश दिना जगाले…!!
मोठी भक्कम महिला नेता
कई निष्पक्ष देशसेवा….
काम तेसन देखता त्यासनी
जगमा समधीकडे झायी वावा…!!
PSI विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =३१-१०-२०२३
2 thoughts on “माय इंदिरा”
Comments are closed.