puranpoli कसा गोड व्हई सन
कसा गोड व्हई सन
आरे पाऊस पाऊस
आसा काय झाया गुन्हा
पानकाया सोडीसनी
कसा उंढायाम्हा उना॥धृ॥
नही पानकाया तुन्हा
कसा करता रे उना
ऐन आखाजीले कसा
रस भेटी रे आंबाना॥१॥
ऐन टाईमले आसा
घात कराले का उना
फिरिसनी कोन तुले
कसा बलायी सांगना॥२॥
नको वारा वावधन
तुले सांगेल व्हतं ना
कच्या कईर्या पाडाले
आसा कसा तु रे उना॥३॥
आंबा म्हायीन कोकिया
कसा म्हनी सांग गाना
सांग सुनाच जायी का
हाऊ मोसम आंबाना॥४॥
कशा यिथीन सनले
सासर्वाशी लेकी सुना
कसा गोड व्हई सांग
मंग सन आखाजीना॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जयगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.