आम्ही आजन्या जिजाऊ

     आम्ही आजन्या जिजाऊ
जय बोला शिवाजीले
जय माय व जिजाऊ
चला करु गुनगान
        जय शिवबा जिजाऊ॥धृ॥
माय शिवाजीनी आऊ
माय जिजाऊ जिजाऊ
हिनी करा बयकट
          देखा शिवबाना बाहू॥१॥
सुभेदार नी व्हवूले
म्हने जशी मन्ही आऊ
आसा सपूत घडाऊ
     बठ्ठ्या व्हवूत जिजाऊ॥२॥
हायी आजनी गरज
गोट ध्यानम्हा व ल्हेवू
सांगू आख्खी दुनियाले
  आम्ही आजन्या जिजाऊ ॥३॥
धडा असा आदर्शना
या वं बठ्ठ्याच गिरावू
नवा इतिहास आत्ये
      आम्ही घडाऊ जडाऊ॥४॥
  निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,  प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जयगांव