नवा उम्रटनां दारसे खान्देशी अहिराणी बोली लेख
लेखक नानाभाऊ माळी
Khandeshi Ahirani Kavita
वावरमां हेर
हेरनं पानी
वाहे लांगी
कोनलें सांगी?
गहू से न्यामी
हरभरा घाट्या
मक्की ताठ्या
खायेत लाठ्या!
कपाशी येची
पदर खोची
दादरनां तोटा
वार्गावर नाची
उनन्हा चटका
करस वटका
रांझन फुटका
बठस झटका
डोकावर उन
वावरतून
थंडक भेटनं
सावलीतून
खान्देशी अहिराणी बोली लेख अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे
गंजज परसंग या उनम्हानी सावली ऱ्हातसं!हिरदले,मनल्हे सुखून दि जातंस!नातं गोतं अश्याच ऱ्हातसं!जुडता जुडता बांधायी जातंस!नातं जोडी ठेव ते हालकी वार्गीम्हा भी खुशीनं वाटसं!नातं थोडंसं मीठ टाकेल!थोडासा गुइ टाकेल!थोडी कैरी सारखं!कव्हयं तिखट सारखं कालायी-कुलायी जोडी ठेव ते आपला आयुष्यभर,जिंदगीभर हायी फुट्र नातं टिकी ऱ्हास!कव्हयं साथ देत ऱ्हास!कव्हयं दुःखम्हा आधार व्हतं ऱ्हास!याचं परसंगम्हा मनोस्नी परीक्षा व्हयी जास!आपली आक्खी हयाती
परीक्षा देवाम्हा खपी जास!चांगलं वागनं!दुसराले मान न्ह पान देवाम्हा आपण जिकत ऱ्हातसं!
तर……….. खनपट डोकाम्हा इचारन्ह वार्ग व्हास तव्हयं खनपट बांगट व्हयी जास!बांगट आपलाचं नांदम्हा ऱ्हास!खनपटायेलं वार्ग झाडनां फांटीवर बिलगी वांदरन्ही मायेक हाद्या कुद्या मारत ऱ्हास!फांट्या येडांग्या व्हयी, झिपाट्या सोडी, वार्गान्हा तालवर नाचालें लागतीस!सावलीम्हा वार्ग घुसी थंड व्हयी जास!हावू खेय दखत बठो तव्हयं समजी लेवो,उंडांया खेय करालें लाग्ना!नागरटी सुरु व्हयी जायेल से!कपाश्या उलगी सोट्या उपाडायीं जायेल सेतीसं!जुवारी, बाजरी, गहू, मक्की, तोरन्हा धस्कटे नागराम्हा पार उल्टा-पाल्टा व्हयी जायेल सेतस!उलटं-पालटं व्हयेलं नागरटीन्हा ढेकाया उन खात बठेल सेतसं!जिमीनम्हा गडेल जावरा-जुवरा मोक्या मोक्या व्हयी जायेल दिखतं ऱ्हातंत!एखांदा वावराम्हा निय्यगार टव्हका दिखास!डोयान्ह पारनं फेडी!ओयासिस व्हयी जास!
परोंदिन ६ मार्च २०२४ बुधवार व्हता!उनन्हा चटका आंगवर झेली आम्हनी फटफटी डांबरी सडकवर पयी ऱ्हायंती!फटफटी धुया कडथुन कापडने-धनूरगंम पयी ऱ्हायंती!खेडा गावें आडमार्गे सेतंस!पन दंडार सेतस!कापन्नान्हा कांदा खान्देशम्हा नवाजेल से!कांदा तिखा सेतसं पन मानसे गोड सेतस!येय परसंग दखी दाडं भी व्हनं पडस!खरं से,आडा चालनारल्हे दाडं भी व्हन पडस!तश्या धनूर-कापडनान्हा मानसे सेतस!
चुकी करी त्यास्ना नांदे लाग्नातं ते झोडालें कमी करतंसं नयी!बरं ते जावू द्या….
……मी याहीस्ना फटफटीवर मांगे बठेल व्हतू!आंडेरंन्हा सासरा फटफटी चालायी ऱ्हायंतात!मी मांगे बठी इबाक-तिबाक दखी ऱ्हायंतू!हालायी-डोलायी,वाकडी-तिकडी मान करी दखी ऱ्हायंतू!डोकावर टोपी,मुसडावर रुमाल बांधेल व्हता!याही गाडी चालायीं ऱ्हायंतात!मी वावरेस्म्हजार कापडनेना कांदा दखी ऱ्हायंतू!धनूरन्हा कांदा आनी लिंबू दखी ऱ्हायंतूं!फटफटी खड्डा-खूड्डास्मायीन उधयी ऱ्हायंती!कच्चा रस्तान्हा दगडे टायी-टुयी याही फटफटी चालायी ऱ्हायंतातं!
मव्हरे धनूर रस्तालें येड्या बाभुईस्न्या काटाया फांट्या निस्त्या झूलूझूलू करी ऱ्हायंत्यातं!तिस्लें टायींटुयीं फटफटी पयी ऱ्हायंती!धनूरगाव टायीस्नी नीट्टचं मयांगमं फाटफटीनं हॅन्डल वयनं व्हतं!आन मंग तठेंग सापडायी, वाकडी-तिकडी गाडवाट रस्ता दिखनां!त्याचं कच्चा रस्ता धरी मयांगमं जायी ऱ्हायंतुत!रस्ताधरी काटाया बाभुईस्न्या फांट्या निस्त्या धरू धरू करी ऱ्हायंत्यातं!काटाया फांट्या घोमालू-घोमालू करी ऱ्हायंत्यात!फटफटी आथीतथी येडी-वाकडी व्हयी वडांगन्हा काटा टायीस्नी नमुदबन मयागंम पयी ऱ्हायंती!आनी एक डावंनां मयानीं हेर पावूत पोहचनू व्हतू!
सोनवद-डोंगरगाव धरणन्ह पानी धनूरनांगंम त्यान्हा पोटले फुगेलं दिखनं!पावसायाम्हा नदील्हे पानी येतं ऱ्हास!पांझरा नदीन्ह पानी न्ह्याळोदथुन पाट काढी या धरणलें सोडेलं से!धरनन्हा फुगवटांगंम मांगे येवावर मया दिखतंस!निय्यागार मया डोयांस्लें निय्यी नजर देत ऱ्हातसं!हेरीस्लें पानीमुये वावरे निय्यगार दिखतसं!याही त्यांस्ना हावू मया नेम्मन तठेचं से!जुनी हेर दिखनी!हेरनी धाववर गच्ची जुनाट,मोठ्ठ झोपाये आंबट चीचन्ह झाड दिखनं!सूर्यदेव डोकावर येल व्हता!उनम्हा आंग शेकायी जायेल व्हतं!कान घोडानं मायेक हुभा व्हयी गयतातं!उनन्ही कानस्लें झामलायी टाकेलं व्हतं!डोकं न्यार शेकायी जायेल व्हतं!
चीचन्हा झाडनीं गह्यरी मोट्ठी झोपायी सावली व्हती!हेरनां धाववर बैलगाड सोडेल व्हतं!तठेचं ढोरेस्लें चारा भरागुंता सपरें भांदेलं दिखनं!सपऱ्यांनं आंगे खुटास्लें बैल भांदेलं दिखनातं!चीचन्हा बुंधडालें लागी म्हसडा, पाल्ल्या भांदेलं दिखन्यात!हेरनां थायनाम्हा पानी भरेलं दिखनं!उनन्हा भरे चीचन्ह्या फांट्यास्वर टिटोया, व्हलगा, हाड्या, मीट्ठु बठेल दिखनातं!बाहेर उनन्हीं झाडन्हा थंडी छावम्हा त्यांस्ना आवाज कानल्हे गोड वाटी ऱ्हायंता!तठेचं धावना आंगे याहीस्ना सर्गे जायेल बापनी समाधीवर डोकं ठेव!त्यास्ना आशीर्वाद लिधा!धाववर गुफेल खाटलं व्हतं!भाव
भावनानं गुफेलं खाटलं व्हतं!त्यान्हावर बठी पुरं बाटलीभर पानी पिनुतं!उन्हम्हा सावली भेटली व्हती!तिस्यास्नी तीस भागनी व्हती!सावलीन्ही थंडी दिन्ही!खटलावर पाच मिंट निजी दख!वर झोपायी चीच दिखनी व्हती!त्यान्हावर निय्येगार आभ्राय दिखी ऱ्हायंत!वर धगधगता सूर्य व्हता!इस्तोंगतं नागरेल ढेकायास्वर दुपार पायीनीं ड्युटी करी ऱ्हायंता!
सावलीम्हायीन दूर पावूतं नजर टाकी दख!सोनवद धरणन्ह उच्चतडांग भितडं डोयाम्हा म्हायी नयी ऱ्हायंतं!धरनन्हा पोटले पानी संगयेल व्हतं!तथायीन एखादी दुसरी धाकलसी वार्गी धीरेजकरी चीचन्हा झाडम्हा घुसी-घुसी फेऱ्या मारी ऱ्हायंती!तठेचं गोयम्ह करी थंडकं दि ऱ्हायंती!धरणम्हा मासा धरनारा गय टाकी फिरी ऱ्हायंतात!पोटले धरनन्हा पोटले लायी बकरक्या,गव्हारक्या बकऱ्या-ढोरे चारी ऱ्हायंतात!बकऱ्या झाड-पाला कुर्तडी ठायकेचं धरन्हा पानीम्हा मुसडा बुडायी पानी पेतं दिखी ऱ्हायंत्यात!बकरक्या सोता सावली दखी झाडनां सावलीम्हा बठेल व्हतातं!काठी ठोकी हाकाऱ्या भरी ऱ्हायंतातं!
याहीस्नी त्यास्ना वावर म्हायीन मक्की मोडी आनातं!दादरन्हा कनसे तोडी लयनात!शेवगान्ह्या शेंगा तोडी आन्यात!ऱ्हायी सुयी वालन्ह्या शेंगास्नी पिसोडी भरी लयनातं!गासोडं व्हडी तानी गाडीवर भांदं!तठेंग धरनन्हा भितडावरं गवूतं!तठेंग धरनन्ह पानी डोयाम्हा ठयरी नयी ऱ्हायंत!आथं-तथ वार्गासंगे धरननां भितडालें धडस्या मारी ऱ्हायंत!उस्मयी वर उड्या मारीस्नी आखो सपक्करी खाले धरनन्हा पानीम्हा एकजीव व्हयी ऱ्हायंत!लाटास्वर लाटा येत जात दख्यात!
खरं सांगस…मी नंगट से!वावर से पन पामम्हेर मोजी इतलंचं से!त्याम्हा बठ्ठा भाऊस्ना हिसका से!धाकल्पने
खेतम्हा मजुरी करी शिकेल से!जीव काल्यावाल्या व्हये!पाय चटकेतं!भुंजायेत!उनम्हा मजुरीन्हा माव्हरा व्हता!कथ भी धाडं काम करी मोके व्हनारा!पोट पूर्त जगनारा ‘मी’ आज याहीस्न धरनन्हा आंगे वल्लानंन्ह कायेभोर वावर दख!निय्यागार पिकें दखात!हेर मोटर दख!हुभा दादर, मक्की,गहू, हरभरा दखात!उंडांयीं बाजरी दखी!बांधवरन्हा निम दखातं!जाम्हुनंन्ह झाड दख!धरनन्ही थंडीगार हवा ल्हीधी!बांधवरन्ह निय्ये गवत दख!वावरना आंगे नदी दखी!नदीन्ही वाऊं दखी!…डोयास्ना आंसू गयनातं!मन्हा आनंदन्हा आंसू गयनात!
तृप्तीना आंसू गयनात!भर उंडांयाम्हा बांधवर चालता चालता आंसू गयीं ऱ्हा यंतात!तोंडं दपाडी आंसू पुसात!गाल आन मन पूर्त वल्ल व्हयी गयथं!देवलें प्रार्थना करी!रावनायी करी…’मन्हा कष्टाळू यायीस्लें!कष्टाळू याहीन बहीणलें!आंडेर-जावाईस्लें!असंच आयुष्यभर आनंदी-सुखी ठेव!पाहिजे ते माले उचली लें देवबा!मन्ह आयुष्य लाभू दे!या देव मानसेस्लें कधीच दुःख देवू नको!यास्लें १००-१०० वरीसथीन मुकलं आयुष्य दे!यास्ना वावरे आक्सी निय्यगार दिखू दे!हेट्या वऱ्हा गुफी गुफी नातास्नी शिलायी पक्की व्हवू दे!
आज शिवराती से!जागतिक महिला सन्मान दिन से!उम्रट उम्रट एक व्हवो!दारन हुगडी नाता उज्जी घट्ट व्हवो याचं हिरदथून शुभेच्छा!
… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-०८ मार्च २०२४