खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

महाशिवरात्री, जागतिक महिला दिन आखो बर्रच काही!

खान्देशी अहिराणी,

खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

भावड्यासहोन नमस्कार!

आपलाकडे हरेक सन, जत्रा, नारनारा उच्छाव, सार्वजनिक कार्यकरमे, लग्ने आन ईतर गनज घरघुती समारंभेसना निचितवार पाडवा करानी तो मनाडानी एक नईनच भू भारी चाल पडी जायेल शे!
पेपरेसवाला आन त्या मिडियासवाला ह्या ते जसा काय तुटीच पडतस बाप येरमयेरेस्व्हर!
कालदिन जे काही घडनं-बिघडनं व्हुई ते आज पेपरेसम्हा छापाई येताच तेन्हावर आज आपीन गडेल मुडदा खंदी खुंन्दी काढीसनी आपला चांगला कामे सोडी सुडीसन बिनकामनी वायबार चर्चा करत बठतंस!
तसं दखाले गयं ते, तो आपला जन्मसिद्ध आधिकारच शे म्हना! नै का? खान्देशी अहिराणी लेख विशेष

महाशिवरात्री ना फराय

सकाय आईतवारे जयगावले आयोजित करेल गझल मुशायराले हाजरी लावानासाठे, काही तठे फुल नै ते फुलनी पाकई ईतला तरी हातभार लावा गुन्ता मी कालदिन महाशिवरात्री ना महा उपासना निमित बनाडेल साबुदानानी खिचडी, साबुदानानी खीर, साबुदानानाच पापडे, साबुदानानाच वडा, चकल्या, साक्रुसना शिरा, बटाटासना चटकदार फराय,त्येसन्याच चीप्स काही केईसना वेफर्स, भगरना खमंग दोसा, भुंजेल शेंगदाना काही तीळना लाडू आसा नारानारा खारा, आलना काई गोडधोड पदार्थ, उपासना चिवडा ते र्हाईच ग्या सांगाना! बैझू! ते ताट दखो ते आव्हडंसं आन फरायेसन्या प्लेटा आन वाट्याच वाट्या, वर आखो ते दही ते नारंच.
आसा तो महा फराय करीसन ढेकरीसवर महाढेकरी देत देत घरथीन निंघनू.


बसट्यानवर आर्धा घंटाना बादम्हा पाचोराले जान्हारी यसटी दखावताच तिम्हा जागा भेटी म्हनीसन मी जीवना हाल करात, आन गनज आटापिटा कया पन, जागा काय भेटनी नै भो बठाले. हाई गाडीम्हा सामान ठेवानी निरानाम यवस्था दखावनी नै, म्हनीसन सामान सुमान खालेच कसं बसं ठीसनी कवधूर दांडा धरीधुरी धक्काधुक्का खात खात काही त्या डरायव्हरनी आचानक बिरेक मारताच समोरनी बाईना आंगवर नैते मांघना धल्लाना आंगवर पडत पुडत भडगाव येत लगून आंग दुखाडत दुखाडत हुबान हुबाच र्हायनू. भडगावले कसीबसी जागा भेटनी एकडावनी तव्हय कोठे जीवम्हा जीव वना!

तुम्हले जर याद व्हई ते मांघे एकनाथ शिंदे साहेबनी यसटी राज्यपरिवहन मंडयम्हा प्रवास करन्हा-या आया-भैनिसले आर्धच तिकीट लागू केल्यावर यसटीवरी प्रवास करन्हा-या आया भैनिसवर मी एक मजेदार लेख लिखेल व्हता आन तो तुमीन आवडखाल वाचीबी काढा व्हता!
तसं दखाले गयं ते आजना रोजे ह्या आयाबायासनी आथा तथा गाव गवतर फिराले जोयजेल का हो? नै ना! पन ह्या मावल्यासले जव्हयसफाईन आर्ध तिकीट लागू व्हयनं तव्हयसफाईन ह्या मावल्या जराखीबी सोय नै खातीस! आजीबात सोय नई खातीस! हां काही कामे गरजे ते जानंस पडस म्हना, पन आज सनपावनना रोजे ते घर र्हावानं का नै? पाचोरा लगून मी बसम्हा चढन्हारा आन उतरन्हारेसनी गम्मतच दखी र्हायन्तू.

समजा वाघळीले एकदुसरी बाई उतरता दखावनी ते त्येन्हा दुप्पट नै ते तिप्पट बाया म्हझार घुशेत. आख्खी बसना पॕसेंजरेस्वर नजर भवडाई दखी ते मानसेसथीन बाया आन धाकल्ला पोर्हेच जास्ती दखायेत जथा तथा. तीच गम्मत कजगाव आन भडगावलनून दखाले भेटनी. तुमीन काही म्हना भावड्यासहोन,  पन मन्हं मातर डोकं फिरानी पाई ई गयथी मायन्यान भो कधी.
बैझू ते ते ते, आखो त्यासनाम्हा काही काही ते माले पंच्याहत्तर वरीसन्या आजीबातच नै वाटेत.

आधारकार्डास्वर त्या पंच्याहत्तरना व्हईच जायेल शेतंस!

मांघे जधय सरकारनी पैसठ वरीसना लोकेसले आर्धी तिकीटनी सवलत जाहीर कयथी तधयच हुशारी करीसनी साठ वरीसना जागावर पैसठवरीसनं वय करीसनी हाई सवलत उपाडी व्हती त्या बाया आन त्या मानसेसनी! हाई आख्खा महाराष्टाले म्हाईत शे! आन त्या हिसोबथीन आते जरी त्या सत्तरच वरीसना व्हतीन तरी पन आधारकार्डास्वर त्या पंच्याहत्तरना व्हईच जायेल शेतंस! आते बोला शेतंस का नई ह्या बाया-मानसे अफलातून डोकेबाज?

ज्या दोन तीन बायासले कंडक्टरनी फुकटनं तिकीट दिन्हं त्या बाया येयायेरीसनीकडे दखी दखी, खिदी खीदी, आन फिदी फिदी दातडा काढीसनी बोली -हायन्त्यात. एक म्हने मी दोन वरीसफाईन फुकट परवास करी -हायनू आन दुसरी म्हने माले बी दोन तीन वरीसफाईन एक शिवराईबी लागत नै माय! याले म्हनतंस डोकेबाज मानसे आन तेसनाथीन महा डोकेबाज बाया!
तुम्हनी मावशी जर सोडी ते मी आजलगून कोनतीच बाईले तिन्हं खरं वय ईच्यारेलज नै शे! तुम्हनी मावशीना दाखला मी सोताच काढी लयेल शेना. म्हनीसन हाई माले समदं म्हाईत शे!
बाईसले तिसनं वय नै ईच्यारवो हावू भारतीय संस्कृतीम्हझारना एक संस्कार माले भू म्हनजे भूच आवडना बरका.

पन ह्या आया बहिनीसनी ह्या संस्कारले बी दीधं गालबोट लाईसनी! मानशेसनी जरी आपलं वय खोटं नाटं सांगं आशी पन एकनीबी परकी बाईले मॕडम तुमचं वय काय? Plz सांगाल का?* हावू प्रश्न आदलगून कोन्तीच बाईले ईच्यारेल नशी! आते माले तुमीन सांगा तो कंडक्टटर कसाले झक माराले आशा बाईसले खरं वय ईच्यारी? ज्येले नौकरी सोडीसनी घर बठी र्हावानी हौस व्हई तोच आशा नसल्या भानगडी कर्रत बठी!

जधय मानूसनी आंगभर व्हई जास खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

भावड्यासहोन तुमीन हर हमेशा माले म्हन्तस का, “आप्पा! एखांदा सन पावनले नै ते, राष्ट्रीय सन उत्सव समारंभनी रोजे आसं निगेटीव्ह नका लिखत जावाना! जरा पॉझिटीव्हबी लिखत जावा!  “पन जधय मानूसनी आंगभर व्हई जास तधयबी पॉझिटीव्हच लिखवो का?
मन्ही शीटना मांघनी शीटवर एक नैतरनी बाई तिन्हा दोन पोर्हेसना संगे बठेल व्हती. त्याम्हातली एक नव दहा वरीसनी पोर गाडी स्पीडब्रेकरवरथीन जाताना वरखाले व्हयनीरे व्हयनी का तिन्हा दोन्ही पाय मन्ही शीटना मांघना भागले टेकाडे, तसं माले कोन्हीतरी मांघेथीन लाता मारेलसारखं वाटे. एकदोन सवा मी तव्हडं मनवर नै लिन्ह पन नंतर मी, ती पोरले वटका करी पडनू आन तिले नेम्मन बठानं सांगं.

मी जठे बठेल व्हतू तठे खिडकीना बाजूले ती फुकटम्हा प्रवास करन्हारी बाईबी बठेल व्हती. ती माले कोन्ताच अँगलथीन पंच्याहत्तर वरीसनी नै वाटे. वर ती माले म्हने का, जराखा आठेथून उठी तथा त्या मानूसनी जोगे जाई बठा, माले मन्ही ननीनले आठे बठाडनं शे! आसं आयकताच मन्हा तयपायनी आगीन मस्तकले जाई भिडनी. मी तिले हातेवरीच ईसारा करीसनी माले नै जानं तथा! आसं जताडीसनी एक ठायकेच बठी -हायनू.

आसं करता करता पाचोरा आन पाचोराथीन जयगावले भिडनू भो एकडावना. जवाई आन पोर तठे माले ल्हेवाले येयेलच व्हतात.

जटाधारी महादेवनं दर्सन

जवाईन त्येसनी गाडी सीद्दी जटाधारी महादेव मंदिरकडे ल्हेताच माले जो संताप येयेल व्हता तो शांत व्हई जाई आसं वाटनं. पन कसानं काय आन, कसानं काय! आठेबी जथा दखो तथा निस्त्या बायाच बाया दखायेत. तिसनी रांग नारी व्हती म्हनीसनी बरं झायं, नै ते दर्सन ल्हेता ल्हेता आठे आखो नाराच फजितवाडा व्हई जाता.

जेम तेम जटाधारी महादेवनं दर्सन काही तठला परसाद ल्हीसनी खोटेनगरले वनूत भो.
हात तिन्ही बैन्हा दांगडो! भावड्यासहोन एक गोट ते सांगानीच र्राई गई तुम्हले! मन्ही बॕग जठे ठेयेल व्हती ती जागा एक शीट सोडीसनी एक बाईना पाय जोडेच व्हती आन तिन्हाम्हा मन्हा मोबाईलनं चार्जरबी व्हतं. घर पौव्हचताज मी मोबाईल चार्ज करासासाठे बॕगना आजूबाजूना खिसा चाफली चुफली भागनू पन, तठे माले चार्जर काही सापडनं नै. मातर ती बॕगना ज्या खिसाम्हा चार्जर व्हतं तो खिसा हुगडा दखीसनी जे समजानं ते मी समजी गवू. जी मावलीनी माले दुसरी जागावर बठाले सांग ती मावलीना ननीननी मन्हा चार्जरवर हात साफ करी ल्हेयेल व्हता!
ते भावड्यासहोन आशी झाई मन्ही फटफजिती!

जय जागतिक महिला दिन!
जय महा शिवरात्री!
जय जय खान्देश!
जय बोला! जय अहिरानी!!!

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव.

महिला दिवस स्त्री शक्तीचा जागर