अहिराणी कवीता भोराभोटा
भोराभोटा अहिराणी कवीता
अडगयनी खोलीमा रांडकी माय
बिनकामनी कोकायी राहिंथी
माले वाढा..माले वाढा..
पोटले चिमटा ली राहिंथी
काय म्हनू या बायीले
जरासीभी आक्कल नही
बाप जेवाले येनार से
इले कसं कयत नही
मोठा पायटाम्हा बायकोनी
पुंज दारनले
वाडवडीलले दिधं निवतं
जेवाले या घरले
सकायपायींग पदर खोसी
सयपाकले लागनी
वाढाना एखोत पत्तरवायी
अपुरी पडनी
आगारीना पहिंलेंग मायले
वाढो तरी कसं ॽ
वरथून म्हनस माय
नातुले दिध तसं
आकरा पितरेसना पोटमा
काव्व्या कोकायी राहिंथात
पिंडनी पत्तरवायीले मातर
लागी नही राहिंथात
झाडवरना काव्व्यासनं
मायकडे ध्यान
वावटयमा उडी गे
पितरेसनं पान
माधव खलाणेकर.
नासिक
1 thought on “अहिराणी कवीता भोराभोटा”
Comments are closed.