अहिराणी कवीता माय मन्ही माले मन्हे
माय मन्ही माले मन्हे अरे
रमा अंगनम्हा नको जाऊ
दख इंजा चमकी -हायन्यात
तुले धोका व्हयी रे भाऊ …
मी इचारु काबर वं माडी
मन्हा मैतर बाहेर खेयी -हायनात
मालेज काबर आसं कोंडी ठेव
नि भेव दखाडी -हायनात …
आजी सांगे तुले ते कयाऊ नही
मरो तू जनमना शे पायाळू
जुना शास्तरम्हा सांगेल शे रे
इज ल्हेस बल्का दिखता पायाळू …
माय तू गमनी तस कोन्ही सांग नई
खर खोट देव जाने मातर मी नई इसरस
पानकयाम्हा देव गर्जस इंजा चमकतीस
तदय माय तुन्ही याद मन मन्ह कुरतडस …
रमेश बोरसे
नवी मुंबई
२९/१/२०१७.
गुलाबदादा यास्नी पायाळूनी पोस्ट वाची नि धाकलपननी याद उनी. दादानी सांग नि वक्टाबरा दोन सबद लिखी टाकात
1 thought on “अहिराणी कवीता माय मन्ही माले मन्हे”
Comments are closed.