आज एप्रिल फुल से
जान जिवान पोरनी
घोर भल्ता भारी कया
जोरी जब्री ई बठनी
माले वुनी तिन्ही दया
माले पडना ईच्यार
म्हन्त आते करो काय
लगे सुचना उपाय
मी म्हंत हॕलो हाय!
लगे वनी मन्हा जोगे
माले म्हने हाय राजा
आते आप्ला लगीनना
वाजाडूत बँडबाजा
मी बी तिले धीर दीधा
आखो जोगे व्हडी लिधं
लिप्स्टीकना व्हटेस्वरी
तिनी माले रंगी दीधं
लाग्नी आल्लाया माराले
व्हयनात लोके गोया
सम्दासले म्हने कसी
यान्ही मारा म्हने डोया
लोके मालेच बोलेत
तू ते भलता कुल से
मी त्येसले बोलनू
आज एप्रिल फुल से
तैन फाईन माले तो
एक एप्रिल याद से
काय सांगू तुम्ले मन्ही
जीनगानी आबाद से
शिवाजीआप्पा साळुंके, ‘किरन’
हल्ली मुक्काम- नवीन पनवेल,
जि. रायगड.
