” बायासना सार सामान ”
” कावं ss रेसम बईन ‘ वं माय तु ते झापाटा म्हाच ऊठनी नी चुल्हा पेटाडाले लागनी . वं माय काय करस आते पोट ना करता करनं पडस . हात पाय हालावं बीगर कसं चाली बरं ! आते तूच सांग ! ” . तवसामा सकवार बोलनीच ‘ मी कव्वईसनी गम्मत दखी राहयंतु माय वं काय आवकाया ऱ्हातीस वं माय तुन्या ? एक ते तुन्हा पाय तुले तरास देस नई का ? ” तश्शीच तु काम करस दख ना माय दखीसन ते माले बठ्ठ आनभुकच लागस ना . । ” पन काय करस बईन आते नसीब ना मव्हरे कोनं चालस का ? नई तूच सांग ‘ “ते पन खरं से म्हना । ” सकवार लगेच बोलनी . रेसम बईन तोंडम्हाईन सबदे काढी ऱ्हायंती पन तिना डोया भरी उनात . पदर वरी डोया पुसात नी परत काम ले लागी गयी . चुल्हा म्हातला लाकडे मव्हरे सरकावात वल्ला लाकडे कसा पेटथीन बरं ! पन काडया कुडया लाईसन त्या पेटन्यात . रेसमबईन भूतकाय म्हान चालनी गयी .

मानुसले एकलं पन जसं खावाले दौडस . ती पन काय करी वं माय . कप्पाय वर जे लिखेल व्हतं त्याले कोनले मिटाडता ई का बरं ! कसं बोलनात बरं । ” रेसम बईन सांगत व्हती ” माय या सार सामान ना दिन शेत . . काय परेड करस माय ? ” धूर निंधी ऱ्हायंता तव तव रेसम बईन पदर वरी डोया पुसी राहयंती . पदर पुसता पुसता ती सांगी ऱ्हायंती ” वं बईन ‘ चिकनीना पापडे ‘ उडीदना पापडे ‘ बठ्ठा कराना पडतस . काय करो मंग ! तवसामा मझारच ती सकवार बोली पडनी “आनी तुन्ह्या दोन्ही सूना चांगल्या शेत वं माय ? ” मंग वं बईन ‘ या सार सामान ना दिन म्हान त्या मना बरोबर चांगल्या राबतीस बरं ! चुल्हा पेटाडा पासून ते लाकडे भांडा आना पासून राबतीस बिचाऱ्या . आनी त्याच आवरी लेतीस बरं ! ” तवसामा सकवार कशी म्हने ‘ पन एक ईचारू का ? तकसामा रेसम बईन म्हने ‘ ‘ वं बईन एक काय दोन ईचार ना बईन i ” आयाय माय ते पन ईचारनं पडस का ?” पन तुले भलती परेड वं माय ” तवसामा सवरीसन सकवार बसनी नी बोलनी ” नई व बईन माले नुसती माहिती काढी लेवानी व्हती वं बईन .

” रेसम बईन ले कोनी तिना काम मा म्हझार ईचारेल आवडे नई ती बोलीच पडनी तिले ” मंग तू येडी ना मायेक ईचारत जावू नको गडया ” . त्यासनं हाई बोलनं ऐकिसन रेसमबईन न्या दोन्ही सूना ऐकी राहयंत्यात . आनी गाल म्हान गाल मा हसाले लागन्यात . . तवसामा आखो सकवार मझारच बोलनी ‘ माय तुन्या सुना चांगल्या शेत वं s s ! ” रेसम बईन म्हझारच बोली पडनी ” मंग मी काय रिकामी बसस का ? ” माले तसं नई म्हनानं व्हतं सवराईसन सकवार बोला ले लागनी .. हाई तसं बोलनं सुरू व्हतं तरी रेसम बईन चाटू लिसन वरना सिमेटना वट्टा वर बसीसन पीठ घेराले लागनी . मंडई पीठ घेरानं चाटूना जोर लावना पडस ताकदनं काम ऱ्हास . बाई दुखनंच काढस म्हंत . राब राब रावनं पडस . पीठ दया पासून ते गाया पासून बठ्ठ बठ्ठ काम मेहनतनं ऱ्हास
मंडई पापडे आवडतस ना ? हाऊ सार सामान घाम काढस म्हंत . वरतीन ऊन . . आनी आपला बाईस ले काय खावाले भेटस बरं ! ‘ भुईमुंगनं बट्ट नी बाजरीन्या भाकरी ? काय ऱ्हास दुसरं गरीब दुब्याना घरमा ? पन एक गोट खरी ” रेसम बईन पापडेसना म्हना सार सामान ना काममा एकदा का लटकनी तिले म्हझार कोनी बडबड करेल अजिबात आवडे नई . तिना दोन्ही सूना शांत सभ्भाव न्या व् शेतीस . लड लड नई चड चड नई ‘ शांत पने कामे करतस. असा संस्कार जोयजेत .

नई आपलं काम भलं नी आपन कोना घर उचापती कराले जावानं कामच नई . मोठी खाले ऱ्हास व धाकली वर ऱ्हास . तीनं माहेर शनी मांडय नं शे पन दोन्ही सुना रेसम बईनना सार सामानमा खूप चांगल्या मदत करतीस बरं ! रेसम बईन ले सकवार ना उबग ई गयथा . तिले काममा मझार बडबड करनाऱ्या बाया नई आवडेत . “कावं सकवार तु दुध लेवाले चालनी व्हती ना ? ” सकवार एकटम दचकीसन उठनीच ” हा वं माय दख माले कानी बोला बोला मा यादच पडी गयी ” मंग व्हय गजानन आप्पा कडे गायनं दुध संपी जाई बरं ! मनमा म्हान मनमा म्हने तुनी रेकार्ड तठेच सुरू कर ” सुकवार नी धूम ठोकी पन भांड तठ्ठेच ईसरी गयी ” रेसम बईन बोलनीच ‘ वं हाई भांड वं ” हा वं माय दख बोला बोला म्हान भांड बी इसरी गयथू ” बठ्ठया जनी तोंड ले पदर लाईसन हसी राहयंथ्यात . रेसम बईन मन म्हान मनमा म्हने ‘ बरं झाये गई घान ” कारन या सार सामान ना दिन शेत .

लोकेसले उडीदना म्हना ‘ नागली ना म्हना पान्या म्हना बठ्ठा परकारना पापडे करी देना पडतस . पन एक गोट मातर खरी मोठी सून मालेगाव नी धाकटी सून शनी मांडयनी दोन्ही सूना साक्षात लक्ष्मी भेटन्या व्हत्यात रेसम बईन ले . या सार सामानना दिनम्हान रेसम बईन ले तिसनी मदत चांगली राहे . चला भो आपले पन रेसम बईन कडथीन काही तरी सार सामान करी आनो म्हंत . रेसम बईना ना हातले बत्तासा बांधेल ऱ्हातस असंच समजा . पुरनपोया ‘ वडया म्हना पापडे म्हना हर परकारना पापडे तुमीन करी ल्या पन त्या तोंडम्हानच राही जातीन त्यांना मांगे भलती मेहनत राहस कष्ट ऱ्हातस . उन्हं म्हान घाम गायना पडस . तवय कोठे हाऊ चटकदार मसालेदार सालभर पुरी असा सारसामान तयार व्हस . बरं मंग भाऊसहोन नी बहीनीसहोन .
येस मंग ! . राम राम . . ! . .
विश्राम बिरारी ‘ धुळे