पोटन्ह हावरं ahirani sentences

पोटन्ह हावरं ahirani sentences

पोटन्ह हावरं
     
नानाभाऊ माळी

काल्दीन मी पोरेस्ले सांग ,’तो टेप लया तें!माले मन्हा पोटनं माप ल्हेनं से!’ घरनास्नी मनगंम ध्यान  नयी दिन्ही!कायजान.. माले बांगा समजी ऱ्हायंतात का येडा समजी ऱ्हायंतात!आज मी तिचं लामेनं लायी धरी  ,’आरे त्या कपाटम्हाना टेप कोनी  दि का माले?काल्दीनफाइन बोंबली ऱ्हायनू मी!बठ्ठा बहिऱ्या व्हयी ग्यात!पड मथ्यास्ना बजार से बठ्ठा!का दात्तखीयी बठी गयी तुम्हनी?मन्हा सबद खुशाल वखरी-कोयपी बांधवर फेकी ऱ्हायनात!’

किद्रीस्नी पोऱ्यांनमायनी, झामली-झूमली मन्हा आंगवरं टेप फेका!डोयातानी तींगंम रागम्हा दख!ध्यान सुदिक दिनी नहीं!घरमा जुनं शिवन-जंतर मशीन व्हतं!आते बंद पडेल से ते!सुईमुडी पडेल से!बठ्ठ जंग लागी जायेल से!तव्हयं कातेरघायी कपडा कापागुंता टेप आक्सी लागे!टेपवर सेंटीमीटर,इंच लिखेल दिखनं टेप जुना व्हता!तरीभी छापेल आकडा शाबूत दिखी ऱ्हायंतात!मी आवर सावर करी,सक्कायम्हा दांगडो हुभा करा!पोऱ्यानंमाय(खटलं) गुच्चूप मांगला दारे चालनी गयी!पोऱ्या मोरीम्हा घुसी बाठना!

ahirani sentences
ahirani sentences

सयपाक घरम्हायीन मोठा नातू हुलकत हुलकत भाहेर उना!नेम्मन वट्टावर मन्हा आंगे यी बठना!त्यांनी हाटकीस्नी इचारं,’बाबा,टेप धरी काय येडाचाया चालू से तुम्हना?’… मी एकदम चंमकायी गवू!नातू ते चार पावले मव्हरे दिखना!त्यांसंगें चाव्वयं सरू करी!गोडी गुलाबीम्हा त्यानंहातमा टेप दिसनी मन्हा पोटना घेर मोजी लिधा!मनंछातडांनां पिंजरांखाले टेपन्ह मुसड धर,खाले ओटीपोट पावूत हुभ पोट मोजी लिध!आड पोट मोजी लिध!पोट कितलं खोल से,

ते भी भायेरतीन मोजी लिध!!पोटना घेर मोजी लिधा!मी पोटना बठ्ठा मोजमापे ली ऱ्हायंतू!तवसामा नातू भी मन्ही मज्या लेवालें लागना!मोजता मोजता पोटलें बोटे टोची टोची गुदगुल्या करी ऱ्हायंता!नातू हासी ऱ्हायंता!मी भीगुदगुल्यास्मा हेंगडा वाकडा व्हयी नाची ऱ्हायंतू!हासी हासी नाची ऱ्हायंतू! तथाईंग,वसरीम्हायीन खटलं ढुकी ढुकी आम्हनी मज्या दखी ऱ्हायंती!मी तीनगंम नजर लायीस्नी खोल ‘मन’ वाची दख!कानवर उडता उडता सबद यी ठोकायनातं,’ वाच्चाय धल्लान्हा वाच्चाय नातू!’

मन्हा पोटना आकार मोजावर माले कयनं!ध्यानमा उनं!पोट हातभर व्हतं का?मंग बिल्लास भर व्हतं?पावसेरं-आस्तेर व्हतं!)?पोट मातर उज्जी दाखलं व्हतं!मी सोतालें इचार ,’ बय… या बिल्लासभर पोटगुंता कितलं हाय हुपस करन पडस?यांन त्यांनसंगे वाकडं तिकडं चाली,तंगडीम्हा तंगडी आटकायी, शेजाऱ-पाजार,गाव-गल्ली, नातं-गोतांसंगे झूलूझूलू करतं ऱ्हातसं!खोटं-नाट्ट बोलीचाली,घरे-दारे भरत ऱ्हातसं!दुसराले घालीपाडी बोली, वयख पायख इसरी,दुसरासन्ह्या  कंनग्या उपसी उपसी आपली कनंगी भरत ऱ्हातसं!कसानगुंता हायी बठ्ठ?या बिल्लासभर पोटगुंता?

हायी बिल्लासभर पोट लांबल्ला हात दखाडी,दुसराना पोटवर लाथ मारत ऱ्हास!घोदा मारत ऱ्हास!सुख दुखना बजार खुटीलें टांगत ऱ्हास!हायी हावरं पोट,चोखंडभर भाकरगुंता झुंगीधरी पयाले लावस!फाफलता फाफलता हुभ ऱ्हावाले लावस! मतलबन्ह्या गोंट्या भरालें लावस!भोयर भराले लावस!घर भराले लावस!हाय उपस करालें लावस!दुसरानी वाट लावानं काम करस!दुसरानी मान मोडानं काम करस!नातं गोतं तोडानं काम करस!जेठा-मोठा,लंगोटीयार तोडानं काम करस!माय -बाप, भाऊ, बहिनी तोडानं  काम करस!कुत्रानंमायेक शेपूट घाली,नईतेंग शेपूट वर करी पयालें लावस!मुडेल वडांगनां कुजेल काटा खूपसान काम करस!आथा तथा तंगडी तोड करालें लावस!आंगवर उपाधी लेव्हानं काम करस!कितलं, कितलं हावरं या बिल्लासभर पोटले?

बठ्ठ मन्हा खिसाम्हा येवाले जोयीजे!बठ्ठा मन्हा पायंजोडे वाकालें जोईजे!दुन्यानी चालता बोलता सबद झेलाले जोईजे!बठ्ठा मन्हा नजर आनी बोटवर नाचालें जोईजे!हावरायेल  मन कावरायेल व्हयी जास तव्हयं दौलत, परापर्टी,पैसास्नी घमेंड यी जास!घमेंड बुद्धीलें गहाण ठी ल्हेस!तठे खटाखट नाता तुटतंस!तठे इय्यावरी पाजेल सबद तुटतंस!तठे भाऊ, बहीण, माय -बाप, मित्र,नाता-गोतान्हा पक्की भांदेलं हवाली भुइसापाट व्हस!काबरं?या हावरं लागेल बिल्लासभर पोटगुंता?हावरं चांगल्या गोटनी जोईजे!हावरं मानसे जोडानं जोईजे!हावरं नातं सीवागुंता जोईजे!आखेर आपल पोट बिल्लासभर से!

नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-२३ मे २०२४