Ahirani Kavita आत्ये पाऊस येना रे
आत्ये पाऊस येना रे
झाडे आम्हीच तोडात
झाया आम्हना गुन्हा रे
एक डाव माफ कर
नही व्हनार पुन्हा रे॥धृ॥
वाट चुकनूत आम्ही
आम्ही लेकरे तुन्हा रे
वाट दाव सुखनी रे
तूच बाप आम्हना रे॥१॥
झाडे चुल्हाले बायात
झया आत्ये लागन्या रे
ऊन तानम्हा तपनू
आत्ये पाऊस येना रे॥२॥
नदी नाला आटना रे
देखिसनी देख ना रे
देखिसनी देख मन्हा
कलेजा बी फटना रे॥३॥
आत्ये येरे सरसर
येरे पाऊस येना रे
येरे येरे ये पाऊस
आत्ये पाऊस येना रे॥४॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जयगांव. दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३

