Ahirani Poem नात
नात
अहिराणी सुविचार
ज्योशिबा संस्कार
नातं टिकाडाले पट्टयारपन जरी करनं पडी,
तरी राग रुसवा, इगो सोडी जपनी पडी भावस्पर्शी गोडी..
गोडवा धरी हरेकसंगे आंतरमनथुन गोडी जपा,
कोल्लावल्ला भावखात नुस्ता आथा तथा, नका दपा….
मान सन्मान जपत हासीखुशीथुन सजाडूत एकी नेकीना जमाना,
मी मनमना वज्जी श्याना, नका पडू कोनीज सोतावर उताना,
सन उत्सव सांगी जातस मानुसकीथुन जपाना बोध,
इतलं तीतलं सहीन करी लेवो, काही चुकावं नही कोनं लेवो हाऊ शोध…
मायबोलीना गोडवा जपूत, ठेऊत दोस्ती नातानी शान,
भेटी निर्मय आपलेपनना आनन, आदर आनी अभिमान…
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले
सोतावर जितलं प्रेम नही तीतलं मायबोलीना जागर करणार लोकेस्वर शे आनी ऱ्हाई
मानुसकीना रंगम्हा, अहिरानीनी धुनम्हा रंगी लिऊत मनपाक हरेकले जीव लाऊत