अहिराणी लेख गुन्हेगार

गुन्हेगार

मी आणि बाई आम्ही दोन्हीजन ६/२/२०२४ तारीखले धुय्याले सिव्हिल हॉस्पिटलमा गवूत,कारण काय ते; मन्या दोन्ही दाढा ठनकेत.धुय्ये जिल्हामा एक नंबर सरकारी हॉस्पिटल, आजुबाजुना परीसरना खेडा पाडाना लोके येतस तठे. मंग आम्ही केस पेपर काढा वीस रूप्या दिसन गवूत वर चौसठ नंबर रूममा.तठे मनी तपासनी करी डॉक्टर मॅडमनी. तपासीसन देख की वरनी दाढ काढनी पडी.मी सांग ठिक से मॅडमनी सी,बी, सी,टेस्ट शुगर बी.पी.अशा चार पाच तपसन्या कराले लावात.

या बाकीन्या तपासन्या वरना रूममा व्हई गयात.आणि त्यानामानी एक तपासनी हाई खाले तीन नंबरना रूममा करानं सांग. मी व बाई आम्ही दोन्ही जन खाले उतरनूत तर बी.पी.तपसनी रूममा खुप गर्दी व्हती.तठेच एक देड तास लागी गया मना नंबर लागाव व्हता.

तेवढामा दोन पोलीस दादा या त्यासना बरोबर तीन चार कैदी सोबत लई उनात.

त्यासले तपासाले कारण कैदी म्हणात म्हणजे सरकारी नियम नुसार त्यासले लयनं पडस दखाडाले त्यासना नंबर लागस तवं आमले तठेच थांबनं पडं लाईनमा.त्यासमाना एक कैदीले मना अंदाज नुसार नऊ दहा वरीसनी शिक्षा सांगेल व्हयी असं वाटे. आमी इचार करूत,यानी काय गुन्हा कया व्हई ती येवढी मोठी शिक्षा व्हयेल से आमी मनमा इचार करूत.पण पठ्याले काहीच फरक पडे नही हो मस्त हासीखुशी मा त्यांना दोस्तारले सांगे कारे भेटाले ते येत जाय.माले काय तू इसरी चालना वाटस.नही रे भो मी कसा काय इसरी जासू बिचारा त्यांना दोस्तार कसा बसा गया त्यांना जोडे बोलना त्यानाशी मंग डॉक्टरनी करी त्यासनी तपासनी आते कैदी म्हणा म्हणजे आपले ते भिती वाटस मनमा कारण कैदीना संगे बोलनं हाऊ भी एक गुन्हा म्हणास कैदी पाहीन दूर राहेलच बरं रहास.कैदी देखीसनच मनमा धास्ती पैदा व्हयी जास यास पाहीन परं परं राहेल चांगलं यासले वयखं भी दखाडवो नही.

गावनं नाव भी सांगवं नही.या कव्हय‌ आपला गये पडी जातीन याना भरोसा नही.कव्हय फसाडी देतीन याना नेम नही. त्याना करता परं राहेल बरं रहास.येवढी नऊ दहा वरीसनी सजा सांगेल व्हयीसन भी त्याले काहीच फरक पडेल नही व्हता.जिवान इतलसा भी उतरेल नही.कोणतीच चिंता, कोणता हावभाव‌ सुध्दा दिसे नही चेहरावर मस्त पैकी तगडा गडी दिसे तो,अजून रूबाबमा असं वाटे की आतेच धरी आणेल से याले, असं वाटे पण कसं से माणूसले एकदावना डाग लागनाना तो मरस तवं मिटत नही.आणि समाजमा कोणी चांगलं म्हणत नही.सर्वीकडे बदनामी व्हत जासं.

भाऊबंदकीमा सगासाईमाहीन उठी जास माणूस.मनं येवढच सांगनं से गुन्हेगारी मार्गावर जाऊ नका आणि आयुष्य बर्बाद करू नका.

अहिराणी लेख

लेखक:-दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे