अहिराणी कवीता बापु

बापू……कवी.प्रकाश पाटील

राम पाह्येटम्हा बापू
उना सपनम्हा आज…
माल्हे म्हणे रे डिकरा
थोडी वाटू द्या रे लाज…….1
गांधी चौकम्हा रे माले
दीन्हा खुशाल खुटाडी
अन शिवाजीले दिन्हा
घोडाव्हर रे बठा डी……..2
हुबा राई राई मन्हा
आते थकी ग्यात पाय
रडे बापूना तो डोया
चष्मा आडे धाय धाय…….3
साले साल उभा राई
बेटा थकी गे कम्बर
मन्हा चस्मानाबी आते
गया बदली नंबर……… चार
न्हई दिसत नेमकी
गोडस्यानी ती बंदूक
गये :सत्यमेव कथं
झाई नजेर अंधुक………..5
न्हई येस का तुम्हले
दल्ला महात्मानी कीव
मन्हा चरखानी खादी
मन्हा ली रायनी जीव………6
फोटो नोट वर छापा
व्हती मन्ही काय चूक
धोस दिनभर माले
नोटा मोजणार थूक……….7
हाऊ बापुना कुढापा
मन्ही पुढारी ले सांगा
घंटा भर्मा लागी ग्यात
गांधी चौकम्हा रे रांगा……..8
धव्या डग्लासनं ठोंगं
देखी बापू ताने डोया
माल्हे म्हणे तू कोणले
करी लयना रे गोया………9
सांगा व्हता तुले घोडा
लई उना ह्या गधडा
काठी उचली बापूनी
माल्हे निखारी बदडा……..10
===================
===================
कवी… प्रकाश पाटील
पिंगळवाडे कर

अहिराणी कवीता

अहिराणी कवीता बापु
अहिराणी कवीता बापु