अहिराणी कवीता पाठना कणा
शीर्षक =पाठना कणा
पाठना मजबूत कणा
बाप मन्हा कष्टकरी
कष्टाथीन खरी व्हयख
मेहनतन जगण संसारी…!!
घरना आधास्तंभ
जुन घराले धोरपन
दिसे बाप मन्हा पायरीवर
खुश व्हस तनमन…!!
मननी खुशी लपाडत
लेकरेसना हट्ट पुरा कयात
संसारना गाड हाकलत
कर्तव्याले सादर व्हयनात…!!
डोंगर एवढ ओझं माथावर
खचना नही कधी मनमा
राब राब राबत ऊना
दिन रात उभा ताठ उन तानमा…!!
मायबाप संसार रथना सारथी
कुटूबांना खरा आधारवड
आयुष्याना मैदानमा चालस
जीवनभर धावपड…!!
भिती माले कसानी जीवनमा
आशिर्वाद त्यासना पाठीवर
रूणी फेढत त्यासना आयुष्याना
नातू खे खेतस खांद्यांवर…!!
बाप मन्हा दयाना सागर
कष्टकरी शेतकरी
जगना पोशिंदा खरा
आशिर्वाद मन्हा माथ्यावर…!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =१७-०६-२०२४
