मन्ही अहिरानी मायबोली मी आनि मन्हा बाप

मन्ही अहिरानी मायबोली मी

मन्ही अहिरानी मायबोली मी आनि मन्हा बाप

मन्ही  अहिरानी मायबोलीना कट्टावरथून

        मी आनि मन्हा बाप

आनि आज बाप दिन

माय आनि बाप आसं द्वैत म्हंजे भेदभाव करताच येव्हावं नही..
पन माल्हे राहीराही लिखू वाटसं..
मायपक्शा बाप थोडासा जास्तच सहनशील रहास..
आते हायी तेवढसं खरं शे..नही त्रिकालाबाधीत सत्य शे की माय आपला लेकरुले ९-९-९-९म्हंजे महिना..दिन..मिनिट.सेकंद  बठ्ठा पथ्थे पायीसन पोटम्हा समायसं हायी परमेस्वरनी आनि निसर्गनियमनी न्यामिनीच कमाल शे.

अहिरानी मायबोली
अहिरानी मायबोली


म्हनून मायनचं कवतिक जास्त शे..
तेम्हा बाप आख्खा झाकायी जास..
आनि जल्मेल पोरेस करता कितलाबी काबाडकसट करात..तरी बाप कोन्हा ध्यानम्हाच येत नही..सदानकदा उपेक्षितच..आंधाराम्हाच..घरम्हा कायी चुकायनं..कोन्हाबीकडथून..दनका बापलेच बसतस..बापना मायबाप जित्ता आसतीन..आनि आपली माय चुकायनी ते बापना मायबाप म्हंथस..माताडी ठी..पोर्हे चुकायनात ते..डोकाव्हर बसाडात बापनी म्हनून पोर्हे मातनात..आपला मायव्हर डोया वटारात ते..माय म्हनस..मायबापनं..बहिन भाऊस्न ऐकीसीन रहानं व्हथं ते मन्हा संघे लगीन कसाले करं?
पोर्याले चांगलं शिकाडीसनबी चांगलं कामधाम भेटनं नहीते पोर्या म्हनसं मायले,दुन्याना पोरे देख..आनि मी आसाच राही गयू..काय करं मन्हा बापनी मन्हासाठी?


पोरले चांगलं देखी लगीन करी दिधं आनि सासरकडना बाट्टोड निंघनात ते पोर म्हनस..मन्हा बपनी माल्हे कसायीना घर दि टाकं..थोडसा खोकला उनाते घरना म्हंथस भाहिरथून काय खायी उनात?
कायीबी व्हवो..जठेतठे बापच आरोपीना पिंजराम्हा..
एखादी चांगली गोट करी बापनी आनि भाहिरना कवतिक कराले लागनात ते माय म्हनस जिनगानीम्हा एखादुक वखत चांगलं कये ते काय तेन्हाम्हा..
एखाद समाजकार्य करं..नाव निंघाले लागनं ते माय म्हनसं दुसरं काय येस तेस्ले..लोकेस्ले काय..बरा भेटना फुकटना सालदार..!!!??घरना कामेस्ले बोंब पडथ नही आनि भायीर जावो बोस्क्या माराले..


भाहीरन्हास्ले धोतरजोडा..
घरम्हास्ला नागडा..
आसं एकनाअनेक उदारणे दिन्हात तरी बापनं उपेक्षित जीनं थांबत नही..
पन बाप ते बापच रहास..
बठ्ठाले पूरे पाडीसनबी तो करीच रहास..
मंग तुम्हीच सांगा..
मायले कोन्हीच संत मीराबाई..जनाबाई म्हनावू नही पन बापले कोन्थानकोंथा संत मानूससंगे भाहीरना जोडीच देथसं..
मायनं महानत्व मान्य करीसन जे उरस ते म्हंजे बापचं..
आसा मन्हा धरीसन दुन्याम्हासला सगळास्ना बापेस्ले मन्हा मनफासून सलाम..मुजरा..नमस्कार ..
आनि सर्वास्ले बापदिनन्या ३६५दिनसाठी स्मरण शुभेच्छा.

मझिसु

पातोंडा..अमळनेर ..ह.मु.डोंबिवली प.