ahirani kavita तू कायबी कर बदलाऊ नयी दुन्या

ahirani kavita तू कायबी कर बदलाऊ नयी दुन्या

मन्ही कविता, मन्हा स्वास मन्हा ध्यास

तू कायबी कर, बदलाऊ नयी दुन्या

तू कायबी कर, बदलाऊ नयी दुन्या,
कहीसन चाली राहायन,
अनादी काय पासून कान्ह्या,
जठे भिसमले नयी बधन. 1

तू बुरखाम्हा, नयीते पदोरम्हा रहाय,
जव्हलोंग मन से मानुसन वढाय,
जठे 60हजार वरीसनी तपस्या भंगनी,
विस्वा मित्र हारना , देवेसनी मेनका जिकनी. 2

वासनाले धरम लागत नयी,
ना जात पात, पंथ ना रंग रूप,
तेन्हा डोकाम्हा ती घुस्सी गयी,
मंग तो कोन्हलेज घालत नयी धूप. 3

गयरं व्हईगे आते, डोकावरतून पानी,
एक घाव दोन तुकडा हाईज गनित,
फास्ट ट्रॅक कोर्ट  खटला लाईसनी,
भर चौकम्हा फासी,काढा केस मोडीत. 4

तीन च्यार वरीसना कच्चा गोया,
वासनाना जर बनत व्हयी घास,
फिरावा सोटा येस्नावर करा चोयामोया,
आते नका करत बसू फुकटना कास. 5

जुनी रचना से पन आजबी जसीना तसी लागू पडस

येथित

मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी.

ahirani kavita
अहिराणी भाषा कविता

ahirani kavita