ahirani kavita खांदेशपुत्र बापू हटकर ७३ वं आभिष्टचिंतन
७३ वं आभिष्टचिंतन
खांदेशपुत्र
माय आहिरानी बोली
सात समींदर पार
तिन्ही कुसमा जल्मेल
हिरा बापू हटकर..!
साहित्यना आभाळमा
बापू इतिहासकार
नवा लिखता हातस्ले
लाख मोलना आधार..!
स्वामी लेखनीना न्यामी
आहिरानी कथाकार
गांव शिवारस्नी गोट
र्हास भूच दमदार..!
उभा ईश्वमा गाजाडं
आहिरानी सम्मेलन
बापूसाहेबस्ना माले
खूप सार्थ आभिमान..!
तंगा मंगानी दंगल
गाजी र्हायनं नाटक
बापू हटकर त्याना
थोर निर्माता लेखक..!
कथा लेखक कवीस्ले
बोल उभारीना देस
मोठा धाक्कला जमाडी
उभा करस खांदेश..!
नही कया कधी गर्व
खरं बोलनारा मित्र
माय खांदेशना बापू
पोटे येयेल सुपुत्र..!
वाढदिने देस बापू
काव्यपंखी या शुभेच्छा
लाभो दांडगी हयाती
हायी देवानी सदिच्छा..!
कवी-देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं ९४२१५०१६९५.

आभिष्टचिंतन मा.आप्पासाहेब श्री.रमेशजी बोरसे