अहिराणी गोट,कथा,कहानी
अहिरनी मायना बठ्ठानबठ्ठा जागलकरीसले हिरदथीन समर्पित!
गोट, कथा, कहानी! मन्हा मरन धरननी!
मन्हा मरन धरननी! गोट कथा कहानी!!
अहिराणी कथा (अ) भय
भावड्यासहोन नमस्कार!
भू दिनफाईन भेट व्हयेल नै आपली. शे ना! कसा शेतंस तुम्हीन सम्दा? मज्याम्हा शेतंस ना?
आजनी गोटना मथया (शिर्षक, टायटल) उलटसुलट वाचीसनी दखा तरी सारखाच वाटंसना? त्येन्हाखाले मी (अ) भय कथा आसं काब्र लिखं व्हई? तेच तुम्हले सांगस. मी जर (अ) भय ना जागे भय कथा लिखतू ते तुमीन वाचाना पह्यलेच घाब्री जातात, नै ते वाचाना कटाया तरी करतात, म्हनीसनीच मी (अ) भय कथा आसं लिखेल शे!
माले तुम्हले तथा आध्यात्म्हनीबी थोडीभूत वयख पायख करी देवानी शे! देव लोके एखादा मानूसले नै ते राक्षसले कसा वरदान देयेत पह्यले? त्याम्हा ज्या नारानारा परकार व्हतातना त्याम्हातलाच हावू एक परकार शे ज्याले अभयदान आसं नाव त्या त्या देवेसनीच ठेयेल शे आन देयेल शे! आन कधी कधी ते त्येसले पस्तावनंबी पडेल शे!
हाई जी कथा शे ना, ईन्हा मी तीन भाग करेल शेतंस. त्याम्हातला पह्यला भाग शे- स्वर्गाम्हातली हाज्यामज्या आन कज्याकुज्या!
दुसरा भागनं नाव शे- आय. सी. यू. (lntensive care unit) म्हन्जे अति दक्षता विभाग. अहिरानी भाषाम्हा मी तुले दखस! आन मन्हा हिसोबथीन, “मी तुले दखी ल्हीसू!”
तिसरा आन तितलाच महत्वाना भागनं नाव शे- सरनवरन्ह मन्ह मरन-धरन!
ह्या तिन्ही गोष्टी लिखन्हारा मी जरी आसनू तरी त्या तिन्ही भागेसना परमुख सुत्रधार म्हन्जे दिग्दर्शक शेतंस आपला आवडता मा. बापूसाहेब हटकर
हाई गोट सबसे हटकर व्हवाले जोयजेल म्हनीसनीच मी त्येस्ले हावू मान देयेल शे!
दुसरा भागम्हा आपली अहिरानी मायबोलीना गनज जागलकरीस्नी मन्ह वज्जी डोकं खादं पन मी ह्या भागना निर्माता (producer) डॉ. जितेंद्रदादा देसले यासलेच नेमेल शे!
माले हाई गोट पक्की आन नक्कीच म्हाईत शे का लेफ्टनंट डॉ. जितेंद्रदादा देसले यासना नावले तुम्हना कोन्हाच ईरोध नशी!
कथाना शेवटना भागम्हाबी मन्ह नाव ल्ह्या, मन्ह नाव ल्ह्या आसा गनज लोकेसनी मन्ह डोकं खाई खाई मन्हा डोकानं बठ्ठ खोकं करी टाकं, पन मी कोन्हच नै आयकं, आन त्या भागनं सुत्रसंचलन मन्हागमच ल्ही ल्हीनं. याले एक मुद्दानं कारन आसं बी व्हतं का ह्या शेवटना भागम्हा कथाना कथानायकले याने की हिरोले मरनं पडंस. म्हनीसन ईतर कोनले मारी टाकापरीस मी एखलाच मरेल बरा यान्हागुन्ता बठ्ठा सुत्रे मी मन्हा सोताकडेच ठेवात. बरबर शे का नई?
अहिराणी कथा ना पह्यला भाग
चला ते मंगन आते हाई कथाना पह्यला भागम्हा ढुकी दखूत……
ह्या भागनं टायटल ते तुम्हले म्हाईतच शे….स्वर्गाम्हातली हाज्यामाज्या आन कज्याकुज्या!
तिरोन मी मरी गवू आसं समजीसनी बैझू! त्या हेलावर बठेल यमराजनी मन्हं बखोटं पक्क मजबूत धरीसनी व्हडत व्हडत तो माले मन्हा घरना भायेर ल्ही गया. जसं त्येनी मन्हा घरनं दार्हन वलांडं तसं समदीकडे लगेच बठ्ठ आंधारंबुचूक व्हई गयं. तठे लाईटनी आन दिवाबत्तीनी आजिबात सोय नै दखावनी.
भूतेक तठे ते डिपार्टमेंट नसवा! जिकडे दखो तिकडे निस्त आंधारंच आंधारं! मातर तो यमराज आन त्येन्हा त्या हेलाना डोयास्म्हाईन बॕटरी चमकायेलना मायेक जे उजायं पडे त्या उजायाम्हा माले तठलं समदं सपरवट दखाए!
आपली जिमिनवर कशी वस्ती र्हास तसी वस्ती बिस्ती ते नै दखायनी माले तठे पन ज्यानत्येन्हा घरेसम्हातला ज्या ज्या लोके मरी जायेल व्हतात त्या तठे लोयत पडेल व्हतात आन काही चुपचाप ईरमायेलनागत बठेल दखायेत.
मन्हा गाव गल्लीम्हातला जितलाबी लोके काही पोर्हे सोरे काही त्या आया बहिनी मरेल व्हतात त्या समदा माले तठे दिखनात. त्या बठ्ठासना डोया आंधाराम्हा मांजरीसनागत जसजसा चमकायेत तसतसा एक एक मानूसले वयखीसनी मी वयख दावाले दखू पन मन्हाकडे कोन्हीच ढुकीसुद्धा नै दखे.
आसं करता करता रस्ताम्हा हुबी ती मन्हा शेजारनी बायजामावशीनी नेकटीच मरेल नैतरनी भुरी नावनी झीप्री पोर मव्हरे दखावताच मी तिले, “ऐ भुरी कशी शे तू?” आसा जोरम्हा आरोया मारी मारी भागनू पन, भुरी, ना व्हकारा दे, ना मन्हाकडे दखे! तव्हसाम्हान त्या यमराजनं ध्यान ती भुरीकडे जाताच यमराजनी माले संस्कृत भाषाम्हा काहीतरी सांगं, पन ते काही मन्हा पले नै पडनं,संस्कृतना बाराम्हा आपली गत, “काला अक्षर भैस बराबर! हाई ते तुम्हले ठावुकच शे!
हाई गोट त्या यमराजना हेलाले समजताच त्येन्ही माले पिव्वर अहिरानीम्हा यमराज संस्कृतम्हा जे काही बोलना त्येन्ह नेम्मन भाषांतर करी सांगं, त्ये आसं…,”हाई जी भुरी शेना तिन्हा डोयाले जी पट्टी भांदेल दखावसना, ती तिले भेटेल शिक्षा शे. हाई भुरी धाकलपनफाईन रस्ताधरी येता जाता मानसेसले डोया मारे आन आठे येवा उप्परबी तशीच करे ती!
एक दिवस ते तिन्ही इंद्रदेवलेबी डोया मारा, पन इंद्रदेवनी काही तितलं मनवर नै ल्हीनं, मातर भगवान शिवशंकरले जव्हय तिन्ही डोया मारा तधय डोया मारताच त्येसले राग वना आन त्येसनी तिसरा डोया हुगाडीसनी हिले शाप दिन्हा!
तहीसफाईन त्येसनी ईन्हा दोन्ही डोयासवर हाई कायारंगनी पट्टी भांदाले लाई. आते भुरीले काहीच दिखस नै!
ती भुरीनी हाई सवय आम्हले बठ्ठासलेच म्हाईत व्हती पन, ती जलमती तसीच डोया मिचके म्हनीसनी आम्ही ती गोट बिलकुलबी मनवर नै ल्हीवूत. पन आठे देवेसलेच तिन्हा प्राब्लेम कस काय नै समजना यान्ह माले भारी नवल वाटनं!
भावड्यासहोन! तुमीन काहीबी म्हना पन माले ती भुरीवर व्हयेल हावू आन्याव व्हयेल नैच आवडना. हाई भुरी म्हन्जे मन्हासारखासनासाठे एकपराकारना टाईमपासच व्हता आसं समजी ल्ह्याना! ती जयजसी डोया मिचकाये तसतसं आम्हले वज्जी मज्या वाटे! मायन्यान भो!
आसं करता करता यमराज माले व्हडत तोडत एक भला मोठा माठजोडे ल्ही गया. त्या माठम्हझार काय शे आसं ईच्याराना पह्यलेच यमराजानी त्या माठमव्हरे ओंजय धरताच तेम्हाईन तेनतेन्ही सोमरसनी बारीकसी धार लागनी. यमराजानी दहाबारा ओंजई भरीसनी तो सोमरस पोटभर पिन्हा आन मंगन त्या हेलाले ईसारा करताच तो हेलाबी सोमरस पेवाले लागना.
त्येन्हा बादम्हा यमराजना हेलानी माले अहिरानीम्हा सोमरस पेवाले सांगताना आठे दुसरं काहीम्हन्ता काहीच भेटत नै म्हनीसनी देवेसनीच हाई सोमरसनी न्यामिनी यवस्था करेल शे! सोमरस पिसनीच आठे देवलोकेस्म्हा लाखो करोडो वरीसलगून जगता येस. पन मी ते हायातीभर कधीच दारु बिरु पिन्हू नई हाई गोट त्या यमराजले ठावूक नशी का बरं?
मन्हा मनम्हा काय शिजी र्हायनं त्येन्हा वास लगेच त्या हेलाला नाकम्हा घुसताच हेला बोलना, तो माले म्हने, “दख भावड्या! तू भलाई दारू पेत नसी पन ते तुन्ह वरवरनं नाटक व्हतं, बाकीना लोके दारू, बियर, रम, व्हिस्की बिस्की पेयेत तधय तुन्हा तोंडले मनमन तसं पानी सुटे हाई बठ्ठी गोट आम्हले चांगली म्हाईत शे. म्हनीसनी तुले सांगस का तू मुगामुगा तो सोमरस पे आन चाल पुढे तुन्हा माय-बाप तुन्ही वाट दखी र्रायनात तुन्हासंगे कज्याबिज्या करागुन्ता!
आते आम्हीन तुले तथा ल्ही जाई र्रायनूत त्या कज्या बिज्याना सेक्शनम्हा! तठे तुन्हा बाप तुले जुत्तासवरी हानासाठे तयार बठेल शे!
भावड्यासहोन त्या सोमरसनी चवनी बरोबरी मातर कसावरीच व्हवाव नै हाई मी तुम्हले दावाखाल सांगस! तुमीन कधय मधय ते गौमातानं गोमुत्र पेयेल शे का? मातर आते यान्हा मव्हरेनं कधी तुम्हले दखानं व्हई ते त्येन्हासाठे तुम्हले सोताच मरंनं पडीन. चला आते आपन दुसरा भाग दखूत. चला ते मंगन आते…!
अहिराणी कथा ना भाग दुसरा
गोटना भाग दुसरा आय. सी. यु.याने की,मी तुले दखी ल्हीसू!
तिरोन मी मेहुनबाराले लगीनम्हा जायेल व्हतू. तठे आहेर बिहेर दी सनी लगेलग परत घर वनू कारन घर पै-पाव्हना येयेल व्हतात म्हनीसनी मटन बनाडेल व्हतं. पाव्हनासले बारम्हा ल्हीजाईसन बियर मियर पाजाडीसनी जेवाले बठनूत.
जेवन आटपीसनी पानटपरीवर गवूत. तठे मावा काही ईमल बिमल ल्हीसनी पाव्हना परभारे नाशिकले त्येसनी फोरव्हीलरवरी निंगी ग्यात. दुसरी रोजे महाशिवरात्री आसल्यामुये उपासच व्हता.
पन माले ह्या महाशिवरात्रीना फरायपानीनी भारी आवड शे. साबुदानानी खिचडी, साबुदानाना वडा, साबुदानानी खीर, चकल्या, पापडे, साक्रूसना शिरा, बटाटान्या चीप्स आशा नारना-या जिनसा वर आखो वर तो भगरना चटकदार दोसा आसा बठ्ठा थोडा थोडा जरी म्हन्त तरी चांगलाच टचबन फराय खावाम्हा वना तिरोन!
समद्याकायशे पोटम्हा बठ्ठा फराय गोंधय घालाले लागना. हाजमोला ल्हिसनीबी काहीच फायदा नै झाया. एकसाय उलटीसवर वर उलट्या, उलटीस्वर उलट्या व्हयेत. जीव जसाकाय आदमरा आदमरा व्हई गया मन्हा.
कोन्ही सांगे परोनदिनना मटनमुये तरास झाया व्हई. कोन्ही म्हने महाशिवरात्रिना उपासम्हातली भगरमुये पोटले फुगारा धरायना व्हई. तिरोन तुमीन जर मन्ह ते फुगेल पोट दखतात ते नवलच करतात. एखांदी दोनदिशी बाईनागत पोट फुगायेल दखाए मन्ह. तरासबी व्हये आन लाजबी वाटे माले!
भू रात व्हुई गई तरी पोट दुखानं आन उलट्या व्हवानं थांबता थांबेच नै. आसं करता करता आचानकच मी बेसुद पडनू. घरम्हा बठ्ठानबठ्ठा घाब्री ग्यात. लगेच तव्हढी रातले दवाखानाम्हा ल्ही गयात, पन तठे डॉक्टरना पत्ताच नव्हता. दुसरा हॉस्पिटलम्हा ल्हीजाताच त्या साहेबनी डायरेक आय. सी. यू. म्हा भरती करी ल्हीनं. सलाईनीसवर सलाईनी सुरू करी दिध्यात, वर नारनारा इंजक्शने देन्हंबी सुरुच व्हतं.
माले सांगा ते दोनदिशी बाईनागत फुगाराधरायेल पोट रिकामं व्हवाबिगर गुजारा लटकाव व्हताका? नै ना? पन ते त्या डॉक्टरले समजी तव्हयना! आसं करता करता सक्काय सक्कायम्हा माले थोडीभूत सुद वनी, पन पोटम्हा व्हयेल पोटशूळ माले जरासीबी चैन पडू नै दे हो! पोट खूपच दुखे म्हनीसन मी एकसाय कयपात करु, आरोया मारू. ओssssss डॉक्टरसाहेब! माले तुमीन बेसुद तरी करी टाका नै ते बैझू मारी तरी टाका हो! मन्हावरी हाई दुखनं सईन नई व्हस! डॉक्टर तुमीन मन्ह आयका हो plz माले बेसुद तरी करा नै ते मारी तरी टाका!
मन्हा आसा हाल व्हताना दखीसनी त्या डॉक्टरनी ईच्यार करीसनी माले एक इंजक्शन दिन्ह. ते इंजक्शन देताच माले डुलकीस्वर डुलक्या वन्यात आन आशी गाढ जप लागनी का काही ईच्यारुच नका! ती आख्खी रात आन दुसरी रोजे आख्खा याय गया तरी मन्हा डोया हुगडता हुगडेत नै. मी झोपम्हा बडबडी र्हायन्तू काही त्या डॉक्टरले गायाबी दी र्हायन्तू.
मन्हा घरना लोकेसले ते वाटे का मी मरीच गवू का काय! तुम्हनी मावशी ते रडी रडी आदमरी व्हई गई! तिले तथी एक खोलीम्हा भरती करीसनी डॉक्टरनी बायको ती डाक्टरीनबाईनी तिन्हावर ईलाजबी सुरू करी दिधात लगेलग.
डॉक्टर साहेबनी आखो एक दोन डॉक्टरेसना सल्ला ल्हीना कारन माले जराखीबी सुद येयेल नयथी. डॉक्टर मन्ही नस दख्यासकरे, दख्यासकरे पन मन्हा दमच नै निंघे. आसं करता कराता आखो एक दिवस आन एक रात निंघी गई तरी माले सुद नई वनी ते नैच वनी. म्हनीसनी त्या डॉक्टरनी आनी आखो बाकीना डॉक्टरेसनी सर्वासनी मिईसनी ईच्यार आच्यार करीसन माले शेवट मयत घोशीत करी दीधं.
आव्हढं करीसनीच थांबनात नैत त्या! त्येसनी मन्ह डेथ सर्टिफिकेट मन्हा आंडोरेस्फान दी बी दिधं! हाई मन्हा मरन धरननी बातमी लागताच मन्हा घरनासनी आख्खा दवाखानाच डोकावर उखली ल्हीना बाप!
अहिराणी कथा ना तिसरा आन शेवटना भाग
गोटना तिसरा आन शेवटना भाग, मन्ह सरनवरन्ह मरन धरन!
दवाखानाम्हाईन माले घर लई वनात. आन बाकी मव्हरेनी तयारीले मन्हा नातेवाईक काही त्या संतोसआबा, सखाराम बापू, सुभासदादा अहिरे, भामरेबापूसाहेब, सदाशिव सूर्यवंशी आसा समदा शेजारी पाजारी जीव तोडीसन आपला आपला कामेसले लटकी ग्यात. कोन काय लई र्रायनात ते कोन काय करी र्हायनात! अमरधामले ल्ही जावानी तयारी काई दहावाना कार्डे छापानी घाई गडबड!
कितला कामे र्हातस त्या पन समदं कसं नेम्मन ठरेल येळ परमाने निचितवार व्हई र्हायन्त. भायेरगावना नातेवाईकबी आवशीन ई भिडनात. मन्ह्या आंडरी ते माले बिलगी बिलगी एकसाय रडेत बाप. त्येसना आकांत दखना-या आयाबहिनीबी तोंडवर पदर ल्हीसनी रडेत! वो दादाssss हाई काय व्हई गयं वो माय मन्हा दादाले! दादा! दादा! जराखी मन्ही वाट ते दखतात! कसकाय आवरी ल्हीनं तुमीन ईतला लव्हकरी? वो मन्हा दादाssssव!
बठ्ठी नेम्मन तयारी व्हताच माले चार खांदेकरी आन एक आक्टधरी आन मन्ही जत्राना मांघे हजारो लोके आसा हावू जत्थान जत्था वाजत गाजत राम नाम सत्त है सत्त बोल्या गत्त है!आसा मनफाईन बोलत चालत आमरधामम्हा माले ल्ही गयात. तठेबी बठ्ठी चेवचतरायवार सोय साय करेलच व्हती.
सरन रचीरुचीसनी त्येन्हावर मन्ह पिरेत ठी सनी मन्हा आंडोरनी माले आगीनडाग देताच आन माले चटका लागताच मी जोर जोरथीन आल्लाया मारत मारत उठी बठनू. जसा ऊठी बठनू तसा मन्हा तो आवतार दखीसनी लोके एकसाय आथा तथा जे पयत सुटनात का काही ईच्यारुच नका. दूर दूर लगून कायं कुत्रबी नै दखावनं तठे आंगेपांगे!
आहो आयकतस का? उठाना सात वाजी र्हायनात! मी आंघोय कराले जाई र्हायनू , दुधवालाना येवाना टाईम व्हुई जायेल शे. तठे किचनना वट्टावर ते बघोनं ठेयेल शे त्येम्हा दूध ल्ही ठेवज्यात आन गॕस शिलगाईसनी तपाडाले ठी दिज्यात!
तुम्हनी मावशीले हाई सप्पननी गोट सांगू म्हनीसन मी लगेच उठनू तवसाम्हाज दूधवालानी आवाज दिधा आन मी बघोनं ल्हीसनी भायेर पडनू!
भावड्यासहोन बोला!
जय जय अहिरानी!
जय जय खान्देश!!
शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, हल्ली मुक्काम- जयगाव