अहिराणी कविता होळी

अहिराणी कविता होळी

व्हई अहिराणी कविता

    व्हई चेटनी

व्हई चेटनी चला चला रे
पिचकारी अन रंग लया रे

श्याम्या, नाम्या, बबल्या, नाना
रंग बनाडुत पयस फुलेस्ना
गारा माटी शेन नका रे

भु-या, भावड्या त्या, ना-याले
धरा धरा त्या पयन्हाराले
मन्हा रंग तो ल्ही पयना रे

मस्त नवा कपडा घालीसन
चिंगी बठनी सजी सव्हरिसन
बाप तिन्हा सरपंच वना रे

चला चला त्या बबल्याना घर
घरना मांघे मया नि वावर
तठन्या कै-या, चिचा लया रे

नाया पाडस बहिन इज्यानी
तिरपी देखस कसी मज्यानी
करुत तिन्हाशे आज कज्या रे

जिव तोडीसन संगस तुम्हले
गाया दीवू नका कोनले
नसली उपात लवू नका रे

शिवाजीआप्पा साळुंके
च्याईसगाव, जि. जयगाव.

अहिराणी कविता होळी