उनी दिव्वायी सव्वाई दिवाळी Diwali

उनी दिव्वायी सव्वाई दिवाळी Diwali

      उनी दिव्वायी सव्वाई
मन्हा घर व दिव्वायी
देखा उनी घाई घाई
उनी कराले  लागनी
        देखा कशी चवडाई॥धृ॥
नही करस इचार
कशी चेटनी म्हागाई
इन्ही औडाई चौडाई
        खर्च आभायले जाई॥१॥
जशी दिव्वायं काढाले
हायी उनी व दिवायी
सन हाऊ उजायाना
       नाव मोठं से दिव्वायी॥२॥
काय सांगू शेजीबाई
माले माहेर बलायी
यश्टीनाबी भाडानी वं
           आत्ये चिंता मिटी गयी ॥३॥
कधी वल्ला कधी कोल्ला
दुस्कायाम्हा येस हायी
दोन घास लेकरेस्ना
       कसा पोटम्हा बी जायी॥४॥
कशी करु गोड धोड
दिवालेबी तेल नही
आशी म्हगाई बितेल
              तरी उनी घाई घाई॥५॥
देखा उनी घाई घाई
मन्हा घर व दिव्वायी
मन्हा घर व दिव्वायी
         बठ्ठा सनेस्म्हा सव्वाई॥६॥
सुख शांती मन्हा घर
लयी इन्हा संगे हायी
मीबी करसू स्वागत
           तव्हयच मन लायी॥७॥

दिवाळी Diwali
दिवाळी Diwali


निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

fb img 17300927407461919802151626786804

जिव्हाळा

गाय वासरूना अंगे
र्हास सदा दयामाया
लाभे शिरी सदोदित
शांती प्रगतीनी छाया

पूजा खरी धन्वंतरीनी
आरोग्यदायी जीवननी
अखंडीत धनवर्षावनी
र्हावो सदा आबादानी

सत्याना असत्यावर
अन्यायना प्रतिकार
सत्कर्म करता करता
उघडो स्वर्गसुखनं दार

घरम्हा लक्ष्मीना वास
र्हावो सदा आबादानी
भाग्य लक्ष्मी पूजननं
लक्ष्मी प्रसन्न घरदारनी

बलिप्रतिपदाना पाडवा
येवो सदोदित  गोडवा
असत्यावर विजयना
शिरी आशीर्वाद मिळावा

प्रेम जिव्हाळा संबंध
दिवसेंदिवस उजळू दे
भाऊ बहिणीस्नी साथ
देवा आयुष्यभर लाभू दे
      
प्रा.अशोक दगाजी शिंदे
मु.पो.सामोडे ता.साक्री
जि.धुळे