अहिराणी कवीता
अहिराणी कविता
पोटना साठे
पोटना साठे करनं पडसं
कोणतं भी हायी काम
चाचभर नही वावर आपलं
तव्हय भेटस भो दाम
दोन पैसा भेटा करता
माणूस खटाटोप करस
उन तान्ह नी नही पर्वा
जीवनाकडे नही देखस
एक एक बोंड काडी काडी
कंबरनी खोय सर्वी भरस
डोकावरना घाम तयपाय,
लगून हाऊ सर्वा नितरस
तव्हय शेतकरीनी किंमत
भाऊ आपले ती कयस
म्हनीसन सांगस बरं मी
संसारनं गाडं असं चालस
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मै.नं.९६७३३८९८७३