Ahirani boli Kavita आम्हना आप्पा
भारी रूपना मज्याना
व्हता रंगना सावया
नाक भांबेरना किल्ला
नेशे कपडा धवया
नाव व्हत बळीराम
सम्द गाव म्हने आप्पा,
कैन जुगन्या रंगेत
नव नाव्हाईन्या गप्पा.
आजा सोडेत झगडा
लोकसले जोडे भारी,
इमानले चोख व्हता
पाही वना दुन्या दारी.
येक सबुद वरी बी
न्हयी दुखाड कोनले,
मान नै दुबया सोता
कमी कोता त्या मनले.
गाव शिववर व्हती
मया मन्हा व आजानी,
बने दुबयाना हात
कधी चुकेना करनी.
झाडे,झुडपे बी लाये
रये धाकलास्ना संगे,
रान पाखरू बी लागे
मन्हा आजलाना मांगे.
न्हयी लिव्हन आप्पाले
तरी डोया वाची काढे,
वन दारशे कोन्ही ते
आप्पा जीवलाई वाढे.
आसा आप्पा मन्हा भारी
गन आवडू आप्पाले,
इचारन देन घेन
गया देवप सांगाले.
काशीकन्या पाटील
पांझराना नदी थडे
काव्यसंग्रह प्रकाशित