आसज व्हतं अहिराणी भाषा कवीता
आसज व्हतं चित्र,
इस वरीस पयले,
आते व्हइगे विचित्र,
पानी पडे येयले.1
बांध कोरायी ग्यात,
झाडेसनी नासाडी,
व्हईगे पानिपत,
कोन तुम्हले वाचाडी? 2
यंदा तरी देव पावेल,
येयवर से बरसेल,
जिरावा पानी पल पल, होऊ द्या घालमेल.3
जथातथा झाडे बी लावा,
नका करू कटाया,
बठ्ठासनी जोर लावा,
सोडा रिकामा चाया.4
येनारी जनपत,
माफ करावू नयी,
करा तुम्ही कायपात,
शेवटली संधी सोडू नयी.5
पर्यावरण रक्षक
मझिसु प्रा. मगन सूर्यवंशी
चित्र सौजन्य -जेष्ठ चित्रकार,कवी, लेखक,गीत, संगीतकार -आदरणीय प्रा. विश्राम बिरारी सर -धुळे