आते वाटस ahirani bhasha words
मन्ही कविता मन्हा स्वास, मन्हा ध्यास
स्वैर मुक्तछंद
आते वाटस
आते माल्हे मनफाईन असं वाटस,
कसावर काहीच नही लिखवो,
पर्यावरण रक्षनना धरवो ध्यास,
*कसाले आकासन्या चांन्या मोजवो? 1
आत्तेज इतलं ऊन पडी राहायन,
रस्तावर आम्लेट बनी राहायन,
तो दिन दूर नयी आपुनज भुंजायसीन,
रस्तावर पिरीत व्हयी पडसून! 2
तंव्हय जागे व्हश्यात का,
जव्हय उठाळीसनबी जाग यीन का?
मंगन आत्तेज जागे रहा हायी ध्यान्मा येईन का?
येयलेज के लागथस समजत नयी का?
मी ते ठयरायेल शे, तुम्हीन संगे राहाश्यात का? 3
जथीतथी कोल्ली पडेल जिमीन, चटका देनारा वारा,
आभायकडे टक लाई देखनारा बयी राजा,
धरती मायले जथातथा तडा जायेल दिखत नयी का?
पानी पेवा साठे तरसी सुकायेल डोयासना ढोरे नजेर आड करता इन का ? 4
जथा तथा अडापाडासवर बाया मानसेना
सुकायेल व्हट मनले टुसतत नयी का?
रानोमाय रांडी मोंडी सगळा डोकावर,
आडका मडका लयी मरेल चेयरा करी फिरताना दिकथस नई का?
देखा गड्यांसवोन हायी समजी
लेवा सिवाय गती नयी5
इचारम्हा पडेल*मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी