धनी काय इच्चार करी रहायनांत? ahirani kavita

धनी काय इच्चार करी रहायनांत? ahirani kavita

धनी काय इच्चार करी रहायनांत?

धनी काय इच्चार करी तुम्हीन रहायनांत                                      आभाय  भरी येवानी वाट दखी रहायनांत||धृ||

नका करु जास्ती तुम्हीन इच्चार,
मन्ही बी मंग तुम्हले दखी तुटी जास तार,
म्हंथस बठ्ठा पानीपाऊस येवा से येयवर,
दम धरा धनी बरसरात व्हयी आपला शिवारवर.
तुम्हीन आभाय भरी येवानी वाट दखी  रहायनांत||१||

हागाम बी चांगला इन , आंदाज वालाबी बोली रहायनात,
तेस्ना तोंडम्हा साखर पडवो हायीज शे आपला  हातमान,
यंदा फिरी दखी देवबा पलटी जाथीन दिनमान,
बदली जाथीन आपलाबी गरीबदुब्याना ग्रहमान.
धनी काय इच्चार करी तुम्हीन रहायनात?
आभाय भरी येवानी वाट दखी रहायनात||२||

उखल्लालेबी देव पावस आसं म्हंथस,
इठोबा यंदा आपले पायी आसं वाटस,
आनि आपिन दुसरा कोंथा इच्चार करु सकथस?
जगना पोशिंदाले आसजं भोगन पडस.
धनी काय इच्चार करी तुम्हीन रहायनात?
आभाय भरी येवानी वाट दखी रहायनांत||३||

पन मी रावनाई बठासले हात जोडी करस,
जेन्हा जिवव्हर भाकर तुकडा खावाले भेटतस,
त्या बयी राजावर ध्यान देवानी दानत ठेवथस,
तेसले जिनगानिम्हा कायी कमी नयी पडस.
धनी काय इचार करी तुम्ही राहायनात,
आभाय भरी येवानी वाट दखी राहायनात.4

बळीराजानं लेकरु
मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी

चित्र सौजन्यः

कवी,मोहन पाटील कवळीथकर

ahirani kavita
ahirani kavita

रामकृष्ण हरि|पांडुरंग हरि

Leave a Comment