Ahirani Kavita अरे मना अरे मना
अरे मना अरे मना
दूर माहेरनं घर
कसा नही रे दमना
काय कोनता मंतर
तुले ठाऊक से मना ॥धृ॥
आत्ये आठे व्हता आत्ये
कोठे जायीस्नी भिडना
नही आठे तठे कोठे
इचारम्हा तू गढना ॥१॥
दूर धाकली बहिन
याद तिबी लयी उना
नाता इतल्याशा दोन
तठे बी रे जायी उना॥२॥
दूर आन्डेरनं गाव
याद तिन्ही बी येसना
आसा कोनता रे पखे
भेटनात रे उसना ॥३॥
कधी वावधन कधी
संगे हासू लयी उना
मन्हा व्हयीसनी मन्हा
आसू डोयाले लयना॥४॥
मन्हा पहिले खुशीना
दिन तुले देखायना
बयं कोठेन इतलं
सांग बा रे तू लयना॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.