ahirani language sentences
भावड्यासहोन नमस्कार!
जवय जवय एखांदा महिना फाईन अहिरानी मायबोलीना नारा नारा खटलास्वर आन त्या खटलासना पाटलास्वर आपली भेट काई व्हयनी नई, म्हनीसन चला आज मुतलं बोली ल्हीवूत म्हन्त तुम्हनासंगे.
पन आजना ईषय जो शे ना तो जरासा आल्लगज शे. याने की बिलकुल हटकर शे! आपला त्या हटकर बापूसा हेबसना गतज बिलकुल हटके!
आन जराखा चिम्हटाबी काढेल शेतंस मी तुम्हले! एकदम ‘लेकले बोले आन व्हवूले लागे!’ आसा चटकदार!
कायरे भावड्यासहोन! हाई काय लाई दिन्हरे आपला ह्या अहिरानी मायबोलीना खटलास्वर तुमीन? ज्याले दखो तो उठसुट याय भर काहीना बाई लिखतच बठंस? आरे! ह्या बठ्ठानबठ्ठा पाटलास्वर लिखालेच जोयजेल हाई माले सोया आना पटस आन कबूलबी शे! पन त्या लिखा कराले काही येय कायनी मर्यादा ते जोयजेल का नको? का जधय तधय लिखतच बठो येडासना मायेक भरभर भरभर भरभर! निस्त त्या हात्तिनागत आन त्या पानघोडानागत शेरेलना मायेक!
तुम्हना त्या सन-वारसनी बी गम्मत तीज, आन आसं काही अवांतर म्हना का ईतर ईषयस्नीबी तीच गत-गम्मत!
आरे! लिखोना, लिखवो, पन जरा त्या लिखा कराले काही लिमीट-बीमीट ते जोयजे का नई जोयजे?
कालदिसपरोनदिसनीच गोट शे. आपला महाराष्ट्रानाज नै ते आख्खा भारतम्हा ज्येस्नं नाव गाजेल शे त्या क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यासनी जयंति व्हती! शे ना? ह्या महान हौस्या गवशा आन नवश्या भावड्यासनी जो लामनदिवा लाई धरा का काई बोलानं कामज नै!
कारे दादासहोन! तुम्हले काय वाटंस ह्या बठ्ठा खटलास्वरना वाचन्हारा लिखन्हारा लोकेसनी महात्मा ज्योतिबा फुलेसना जीवनवर काहीच वाचेल नै हुई का? आरे भो लिखाना, पन निदान वाचनारेसना जराखा आवाका बिवाका ते दखत जावा. एकच भावड्यना लेख वाचाले दाहा पंधरा मिन्टे जर लागथीन ते बाकीनासनं कधय वाचानं आम्हीन? बरं ते जाऊद्या! बैजू लिखतंस ते लिखतंस पन त्या शुद्धलेखनकडेबी निरानाम काना डोया करीसन लिखतस!
मी ते आसं म्हन्सू का त्या शुद्धलेखननी बठ्ठी ‘माय भैन………टाकतंस!
आसं कोठे चालंस का बरं? आरे! हारेक भाषानी लिखा बोलानी आन वाचानी एक खास शैली र्हास. त्याले भाषाशास्त्र म्हन्तस! त्यान्हा काही निति नेम (नियम) र्हातंस. हाई ते तुम्हले म्हाईतच व्हई! बरं समजा नै जर म्हाईत व्हुई समजा, ते एखांदा जानकारफाईन जानी ल्हेवोना! मी कसा त्या मव्हनदादा कवळीथकरले दावाबिचूक पोस्ट नै कर्रस तसा! त्याम्हा काही कमीपना शे का? पन नै! ह्या भावड्या सोतालेज अहिरानी मायबोलीना जानकार, भाषाशास्त्रज्ञ-बिस्त्रज्ञ समजीसनी जे लिखत बठतस का नै, ते काही ईच्यारता सोयज नई!
हाई झायं अहिरानी मायबोलीम्हा लेख लिखनारेस्न ग्यान. बैझू त्या कईतास्ना बाराम्हाबी त्याच आनभव येतंस ना हो! मंगन ती आष्टाक्षरी, षष्टाक्षिरी र्हावो का मंगन गझल-बिजल र्हावो. माले सांगा त्या अष्टाक्षरी कईतास्मा जठे तठे ती, तू, मी, गं, रे, शे, ले, दे,का, कू, की, बी आसा सुटा सब्दे जठे नै गरज तठे घालीसनी अष्टाक्षरी कईता लिखाले जोयजेल का? अष्टाक्षरी ना पैह्यला भागनी सुर्वातम्हा दोन, चार नै ते सव आसा सम आक्षरेच ल्हेवाले पाह्यजेतना! पन काही काही भावड्यासले आन मन्ह्या माय बहिनीसले काय उपरती सुचस काय जान! त्या आठ आक्षरे नेम्मन बठाडानासाठे काय काय कल्पात कर्तस आन काय नै ते त्यासना देव जाने आन त्या सोता जानोत. हाई दखा हाई आपला बहिनामायनी आष्टाक्षरी रचना…….
मन वढाय वढाय
जसं पिकावर्ल ढोर
किती हाकलारे त्याले
फिरी येते पिकावर
याम्हाना जो सुटा सबुद ‘रे’ शे त्यान्हा वापर कितला बेमालूम करेल शे! तेले निरर्थक वापरेलज नई.
वाचाले, बोलाले आन गानं बनाडालेबी सोयनं पडस सिवाय प्रवाह कोठेज खंडित नई व्हस!
आते विश्वसंत, संत तुकाराम महाराजनं उधारन ल्ह्या…..
याम्हातला सुटा सब्देसना वापर कितला नमूदबन करेल शे, ते दखा..
जे का रंजले गांजले
त्यासि म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
दाव तेथेचि जाणावा
याम्हातला ज्या सुटा सबदे शेतंस त्या एक दुसराले पुरक व्हईसनी आर्थले प्रवाही आन भावपूर्न करन्हारा शेतंस!
मृदू सबाह्य नौनित (त्या कायना बीलीभाषाले धरीसन)
तैसे संज्जनाचे चित्त
ज्यासि अपंगिता नाही
त्यासि धरी जो हृदयी
याम्हाबी जो हावू सुटा सबुत शेच नै तो वर्हनी आष्टाक्षरीना आर्थ पूरा कर्रस.
ह्या उधार्ने यान्हासाठे दी र्हायनू का पाच सौशे वरीसफाईन हाई आभंगरचना आपीन आयकी बोली आन लिखीबी र्हायनूत, गाईबी र्हायनूत तरी आझून आपले आक्काम्हातला बोक्काबी समजेल नै! मी ते तुम्हनावर आरोपज लावसू! तुमीन काहीबी म्हना! भले माले दोस का देतंस नई!
सुटा अक्षरे सरसगट न वापरता त्यासना आर्थ प्रवाही आन आर्थपूर्न व्हवालेच जोयजेल.
भावड्यासहोन!
मी आवढा आटापिटा यान्हासाठे करंस का तुम्हनं गद्यनं लिखान र्हावो का पद्यनं, ते रितभातले आन भाषाशास्त्राले, धरीसनीच जोयजे!
दुसरा महत्वाना मुद्दाना बाराम्हा ते मी सांगी सांगी थकी गवू! मायन्यान भो! निरानाम खिसाना खिसाना व्हई गवू मी, पन तुमीन ती गोटकडेबी जानून डोया लायेनना मायेकच कानाडोया कर्तस, आजिबात ध्यानच नै देतस!
ती मुद्दानी गोट म्हन्जे या धाकला ‘न’ ना जागावर तुम्हीन हाऊ मोठा ‘ण’ काब्र वापरतंस? जरा सांगश्यात का? आपली अहिरानी मायबोलीम्हा बोलतानाच जधय आपन ‘ण’ ना वापर नै कर्तस ते मंगन तो तुम्हना लिखाम्हा येवाले जोयजेल का? बिलकुल नै येवाले जोयजेल!
पन, नै मन्हा भावड्यासले किथलकबी जताडी समजाडी सुमजाडी सांगा! आखीर शेवट काहीच फायदा नई व्हस. ते म्हन्तस नै का ‘मेरी मुर्गी की डेढ टांग!’
दखा ज्यासले अहिरानी मायबोलीनी खरखुरज गोडी शे ना त्यासनी आजफाईन सप्पेत खाई ल्हेवो का मी यायम्हा निदान एक दोन तास तरी अहिरानीम्हाच बोलसू. अहिरानी आयकसू, आन मंगज आहिरानीम्हा लिखसू!
आरे! आपलापरीस ते ती फॉरेनर लेडीना गत, नक्षत्रनासारखी सुंदर, गोरीभरार, पन तितलीच तेजतर्रार आहिरानीम्हा बोलन्हारी निकिता पाटील पोरले मी पहिला नंबर दिसू. हौ!
दखा! आव्हढाम्हा बापूसाहेब हटकर यासना पानीना बाराम्हा लिखेल लेखना सारांश तिन्ही तिन्हा रीलम्हा देढच मिनिटम्हा काय चेवचतराईवार आन नमूदबन पटाडी सांगेल शे! जरा नीट ध्यान दी सनी तिन्ही अहिरानी टूनिंग आयका ते खरी नेम्मन कान दी सनी!
शायम्हा ईंग्रजी शिकाडताना आम्हले ह्या पॕटर्नवर भर देनी पडे.
L- Listening
S- Speaking
R- Reading
W- Writing
आते आजफाईन हाऊ फारमुला पक्का ध्यानम्हा ठेवा.
मी ते म्हनस का पाठच करी ल्ह्या!
(१) Listening- म्हन्जे नीट, नेम्मन आयका.
(२) Speaking- म्हन्जे नीट, नेम्मन तीच भाषाना उच्चारशास्त्रपरमाने चढ ऊतारसम्मेत (आरोहआवरोह) बोला.
(३) Reading- म्हन्जे तीच भाषाना उच्चारशास्त्र परमाने नीट, नेम्मन वाचा.
(४) Writing- म्हन्जे ती भाषाना भाषाशास्त्रपरमाने, शुद्धलेखननानुसार लिखा.
हाऊ फारमुला मी ईंग्रजी भाषा शिकाडताना भलेज वापरू, पन तो जगम्हातली कोठलीबी भाषाले लागू व्हस. दखा तुमीन!
भावड्यासहोन!
माले माफ करा, पन हाईच गोट मी मराठी, हिंदी आन ईंग्रजीना बाराम्हानबी वाची वाची, आन आयकी आयकी किद्राई गवू पन माले सोया आना (मन्हासैत) निर्दोस बोलन्हारा, लिखन्हारा आन आयेकन्हारा दखावतंसच नई!
आपली जगविख्यात गायिका स्व. लतामंगेशकरनी नी उर्दूभाषाना उच्चारे शिकानासाठे उर्दूना जानकार मास्तर लाई ल्हेयेल व्हता!
म्हनीसनी मी तुम्हले हात जोडीसन रावनाई कर्रस का
नेम्मनज आयका!
नेम्मनच बोला!
नेम्मनज वाचा!
आन, नेम्मनच लिखा!
आज भलेज माले गाया-मिया दीसनी दोन भाकरी ज्यास्तीन्या खाई ल्हिज्यात पन ह्या शिवाजीआप्पानी गोट गाठ मारीसनी, नीट ध्यानम्हान ठेवज्यात! यान्हा नंतर मी हाई गोट परत फिराईसनी पांचटना मायेक सत्राडाव सांगाव नई!
चला ते मंगन ठेवस आते!
जय खान्देश!
जय अहिरानी!!
तुम्हनाज!
शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव.