खान्देशी अहिराणी बोली लेख थरक भरायेल एसटीना परवास

थरक भरायेल एसटीना परवास खान्देशी अहिराणी बोली लेख

खान्देशी अहिराणी बोली लेख लेखक नानाभाऊ माळी

परवास कव्हयं मज्याना ऱ्हास!कव्हयं डोकं उठाड ऱ्हास!कव्हयं कज्यानां ऱ्हास,भांडन तंटान्हा ऱ्हास!कव्हयं हुभं ऱ्हायी ऱ्हास!कव्हयं चेंगरा चेंगरीन्हा ऱ्हास!कव्हयं वकेल गंधा पटक वासनां ऱ्हास!कव्हयं एसटी खड्डा टायी पयेस तव्हयं आंगेनान्हा आंगवर पडनुत ते गाया खावाना भी ऱ्हास!कव्हयं डायव्हर एकदम ब्रेक लायी गाडी हुभी करस तव्हयं बठेल आन हुभा बठ्ठा इरेखिरे व्हयी जातंस!कव्हयं खड्डाम्हा चाके जातंस तव्हयं आपलं डोकं एसटीना वरना टपरालें ठोकायी जास!कव्हयं कंडक्टरफान सुट्टानंगुंता मांगे लायी किरकिरी ऱ्हास!कव्हयं कंडक्टरफान एखादा रुप्या ऱ्हायी ग्या,एसटी निंघी गयी ते तयतय करा सारखं व्हयीं जास!परवासीस्मा धरधारी व्हयी जास तव्हयं कोना
कोनल्हे टायमेय ऱ्हात नयी!पन एसटीन्हा परवास यादगार पल ऱ्हातसं!इसरो नयी आसा ऱ्हातसं!

खान्देशी अहिराणी बोली लेख
थरक भरायेल एसटीना परवास

मी आनी मन्ह खटलं ०४ मार्च २०२४ नां आयतवारन्हा दिन मध्यपरदेशम्हा दोंडावाडा, पानसेमल,खेतीया जायी ऱ्हायंतू!०४ मार्चंनां दिन माव्यालें शिरपूर-पानसेमल एसटीवर बठनूतं!नसीबथुन शेवटला सीटवर जागा भेटनी व्हती!एक एक गावें मांगे जायी ऱ्हायंतात!बोराडी,मालकातर वाड्या-पाडा पार करी एसटी मव्हरे पयी ऱ्हायतीं!महाराष्ट्रनं शेवटलं गाव मांगे गये!जंगल व्हतं!रात व्हयी गयती!एसटी आंधारामां लाईटन्हा डोया फाडी-फाडी पयी ऱ्हायंती!मव्हरे एमपी लाग्न!दोंडवाडान्हा पहिले नदी लाग्नी!तीं झूईझूई आवाज करी व्हायी ऱ्हायंती!तिव्वर पूल भांधेलं दिखना!रातना ८-३० वाजेल व्हतात!एसटीनां खिडिकी म्हायीन डोक बाहेर काढी दख!जथ बन तथ आंधारं दिखनं!जंगलन्हा झाडे फांटीस्वरी एसटीलें ठोकायी ऱ्हायंतात!आंधाराम्हा एसटी सोडी काहीच दिखी नयी ऱ्हायंत!आंगे पांगे निय्यीगार खेती व्हती!खेतीमुये, नदीमुये थंडी आंगलें लटकी ऱ्हायंती !

डायव्हरनीं एकदम ब्रेक लायी पूल वलांडान्हा पहिलेचं एसटी थांबाडी!कंडक्टर बोलना,’पूलन्हा तथानंदडे ऊसन्ह ट्रॅक्टर पंचर व्हयी जायेल से!निरुंग रस्ता से!एसटी मव्हरे जावाव्हू नयी!आठेच थांबी!बठ्ठाजन आठेचं उतरा!’ अश्या परसंगलें रातना आंधाराम्हा कता जायी मानोस?तठेंग दोंडंवाड देहेड किलोमीटर दूर व्हत!चार पाचचं जन एसटीम्हा ऱ्हायेल व्हतात!

एसटी दोंडंवाडे मार्गे पानसेमल व्हती!आमल्हे पानसेमल्हे जानं व्हतं!पानसेमल आजून ०७ किलोमीटर दूर व्हतं!आन्नेड रस्ता व्हता!त्याम्हा आखो एमपीम्हा घुसेलं व्हतुत!काहीजन तठला दोंडवाडानां व्हतात!आम्ही नवख्या व्हतूतं!पन तठला बठ्ठा लोके अस्सल अहिराणी भाषाम्हा बोली
ऱ्हायंतात!एक भाषामुये थोडासा धिवसा भेटना!तरी भी काय करवा बवा?आंधारी रात दखी,थंडी दखी आंगवर काटा हुभा ऱ्हायना व्हता!

आखो खान्देशी अहिराणी लेख वाचा

खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे


येरायेरलें आधार देत-लेयेत

आंधारं चेंदत, बीन वयखीना रस्ते चाली ऱ्हायंतूतं!मव्हरे दुरथून लाईट चमकालें लाग्नातं!मोबाईल बॅटरीनां उजायाम्हा धिवसे धिवसे तठपावूतं पोहचनूत!दोंडवाडं गाव येल व्हत!दोंडवाडान्हा पॅसेंजर ज्यानं त्यानं
घरम्हा गुडूप व्हयी ग्यात!आम्ही दोन आनी आजून दोन पॅसेंजर दोंडावाडानां स्टॅण्डवर हुभा व्हतूतं!

मन मन थंडी व्हती!तठेंग पानसेमल जावालें एखादी गाडी भेटी का तपास करी दख!काही गॅरंटी नयी व्हती!पानसेमल ०६ किलोमीटर दूर व्हत!थंडी न्यारी वाजी ऱ्हायंती!वाजी काय चांगली कुमचाडालें लाग्नी व्हती!मन्हा संगे मन्ह खटलं व्हत!आंधाराम्हा धुर्ते धुर्ते या पराया ठिकाने कवलोंग चालसूत?आसा इचार करी मव्हरे चाली ऱ्हायंतुत!

दोंडवाडाथुन पानसेमल खेतीया सेंधवा हायवे दिखना!गाड्या काय दिखी नही ऱ्हायंत्यात!जी नदी दोंडंवाड गावना पहिले लागनी व्हती!तिचं गावलें वयसा घाली,गोल फिरी हायवेलें आडी व्हयी व्हायी ऱ्हायंती!नदी एकदम खोल व्हती!मोठा उच्चापुरा पूल व्हता!अंधारी रात व्हती!आम्ही दोन्ही जन एक एक पाय उखली चाली ऱ्हायंतूतं!नेम्मन पुलवरतुन चाली ऱ्हायंतूतं!
पूलन्हा खाले नदी व्हायी ऱ्हायंती! किड कटुकस्ना आवाज आंधारालें दोस्तार समजी ऱ्हा यंतात!खोल नदीन्हा झूईझूई आवाजमुये थंडीम्हा भी आंगलें घाम फुटी ऱ्हायंता!आम्ही आंधाराम्हा येरायेरलें धिवसा देत एक एक पाय उखली चाली ऱ्हायंतुत!एखादी दुसरी गाडी आम्हनावर फोकस मारी हायवे वरतून मव्हरे निंघी जायीं ऱ्हायंत्यात!

पानसेमल आजून पाच किलोमीटर दूर व्हत!आम्ही चाली ऱ्हायंतुत!आम्ही पानसेमलल्हे जठे जानार व्हतूतं त्या पाहुनास्लें मोबाईल करी सांग व्हतं!त्या आम्हले लेवाले त्यास्नी गाडीवर यीं ऱ्हायंतातं!तवलोंग चाली ऱ्हायंतुत!आंधारं चेंदत,एक एक पाय उखली चालत!थंडीलें आंगवर ल्ही आजून आर्धा एक किलोमीटर चालनू व्हतीन तितलाम्हा समोरथुन गाडीन्हा फोकस मारी मोठा भाऊस्ना जवाई यीं लागात!जीवम्हा जीव उना!आम्ही तिन्हीजन स्कुटीवर टिबल सीट बठनुत!गाडीन्हा स्पीडम्हा थंडी आम्हनी चांगलीच मज्या ली ऱ्हायंती!स्कुटी चालावनारा जवाई भी थंडीम्हा पुरा हुडहूड करालें लाग्ना व्हतातं!जश्या तश्या रातना साडे नऊ वाजता त्यास्ना घर,पानसेमलल्हे पोहचनूत!

परवास थंडीम्हा भी घाम काढ्या व्हता!परवास आंगवर काटा येनारा व्हता!तठे रातना आकरा वाजालोंग जेवने खावने व्हयनात!रातनां देड वाजा पावूत गप्पा मारता मारता डोया कव्हयं लाग्नात ते समजनचं नयी!सक्कायम्हा हेट्या सूर्यनारायण आम्हले उठाडी ऱ्हायंता! मांगला
दिनन्ही याद दि हासी उठाडी ऱ्हायंता!



नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
दिनांक-१० मार्च २०२४