गुलाबाई गुलोजी लेखक विश्राम बिरारी

गुलाबाई गुलोजी लेखक विश्राम बिरारी

गुलाबाई – गुलोजी ”

” भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला .

पार्वती बोले शंकराला ‘ चला हो आमच्या माहेराला ”

काय गोड आनी कसं मज्यानं गानं शे हो हाई ? ऐक का तुमीन ? ऐका ते खरी .. या गुलाबाईना गाना भाद्रपद महिनामा गनपती बाप्पा उठनात का पोर्निमा पासून ते थेट कोजागिरी पोर्निमा लोंग बये दखानच काम नई ऱ्हाये पोरीसले . दिवाबत्तीनी ये झायीरे झायी का एकमेकना घर पोरी जायेत गुलाबाईना गानासना स्वर ऐकाले भेटेत . घरोघर बर का । पन आते कथा मथा भेटतस ऐकाले . पन ती मज्जा नई राह्यनी . पन हाऊ लोक संस्कृतीना उत्सो भारी नमरी बरं ! त्यानी आपन आज माहिती दखुत . . . कृषी प्रधान संस्कृतीनी शिवशक्ती नी प्रार्थना पार्वती मायनी प्रार्थना कराना हाऊ पोरीसना उत्सो असं म्हणाले काय हरकत नई . डोकावर फेटा ‘ धोतर नेसेल शंकरजीनी मुर्ती आनी पार्वती नऊ वारी पातय नेसेल तिना मांडीवर लेकरू ते लेकरू म्हंजे हयकुंड म्हंजी आपला गनपती बाप्पा ..! तर अशा मातीन्या मुर्त्या लेवाले पोरीसनी झुंबड उडस या भाद्रपद महिनामा …! खरं दखाले गये ते हाऊ उत्सो आपला कडे विदर्भा म्हाईन येल शे . म्हनीसन या गामा मराठी आनी विदर्भा कडना वाटतस .. अकोला जोडे ” आकोट ” नावनं गाव शे तठे भुलोबा आनी भुलाबाईनं पुरातन मंदिर शे . तठे या पंधरा दिनना मोठा उत्सो ऱ्हास . तीनशे वर्षापेक्षा बी जास्तीना वर्षे व्हयेल व्हतीन म्हने . कोकन मा पन हाऊ गुलाबाईना उत्सो पोरी साजऱ्या करतीस . कोकनमा हादगा आनी भोंडला म्हंतस . असं बी सांगतस भाद्रपद महिनामा शेती म्हाईन आपला घरमा म्हंजी शेतकरीना घरमा नवाईन धन्य येस . सर्वासले आनन व्हयेल ऱ्हास . या धान्यानी रास पुंजा कराना हाऊ उत्सो ऱ्हास . पार्वती हाई अन्नपुर्णा देवी शे . म्हनीसन तिनी शंकर देवनी स्थापना पोरी आपला घर करतीस . गनपती उठना रे उठना दुसरा दिनच पोरी कुंभार ना घर जातीस आनी शंकर पार्वती माटीनी मुर्ती लई येतीस . आनी तिनी विधीवत पारंपारिक पध्दतीखाल आपला माटीना घर स्थापना करतीस . आते हाई पुंजा कशी मांडतस ते दखुत जठे गुलाबाई बसाडानी शे . . ती जागा चांगली सारी पोतारी लेवानी . कोनी कोनी पोरी बोखलामा पन बसाडतीस . तर ती जागा पानी शितडीसन पवित्र करी लेवानी . तठे पाट मांडाना . पाटवर लाल मद्रा ना कापड ठेवाना . त्यावर मंग हयद कुंड ( हयद नं तुकड् ) खारीक ‘ सुपारी ‘ तांदुयना दानासन्या राशी ठेवान्या . चिमुट चिमुट भर तांदुय पसराई देवाना . रोज गुलाबाईना मव्हरे खिरापत ठेवनी पडस . तेल तूपना दिवानी ज्योत उजाडत ठेवनी पडस . मी वरतेच म्हनेल शे हाऊ शेती संस्कृतीना उत्सो शे . पार्वती हाई अन्नपुर्णा देवी शे . भरेल घरमा वावरेसम्हाईन शेती म्हाईन भाद्रपदना महिना मा मुंग उडीद ‘ धान्य ‘ कडधान्य पोता भरी भरी येतस . आनन वाटस . या धान्यानी रास पुजा करानी नी शंकर अन्नपुर्णा पार्वती माताना उत्सो कराना हाऊ भाद्रपदना महिना ऱ्हास . रोज पोरी मंग एक मेकना घर गाना म्हनाले जातीस . कोजागिरी पोर्निमा पर्यंत हाऊ उत्सो चालस . ” भाद्रपदाचा महिना आला आम्हां मुलीनां आनंद झाला . पार्वती बोले शंकराला … चला हो आपल्या माहेराला ” आज आमच्या गुलाबाईला दहावा दिवस दहावा दिवस . दहाव्या दिवशी बाळाला टोपी मोत्यानी गुंफली जो जो रे … जो जो रे … मजाना गाना ऱ्हातस . आते हाईच दखाना …. ” सोन्याचा करंडा ‘ मोत्याचं झाकण … तिथं आमच्या सासु बाई कुंकु लावत होत्या ‘ कुंकु लावत होत्या . सासु बाई ‘ सासु बाई मला मूळ आलं जाऊ द्या मला माहेरी माहेरी … मला काय पुसते ‘ बरीच दिसते पूस तुझ्या सासऱ्याला सासऱ्याला ” अशी छान छान गाणी म्हणतात . . मंग ज्याना घर गुलाबाई ऱ्हास ती पोर तिनी खिरापत दपाडी ठेवस . एक रुमालमा गुंडाई ठेवस . आनी वयखाले लावस . कोनीच वयखत नई . त्या पोरले आनन वाटस . तिना चेहरा खुली जास . आपली खिरापत कोनीच वयखी नई हाऊ मोठा आनन तिना चेहरा वर दखास . गुलाबाई भुलाबाई भुलोबा यानी कथा अशी सांगतस . हाई कथा पोरानीक म्हना की मौखिक म्हना पन जी ऐकामा उनी ती मी सांगस . ” एकदा महादेव नी पार्वती सारीपाट खेवाले बसनात म्हने . त्यासना खेय रंगना . पन खेयता खेयता पार्वती जिकी जास . शंकर जी चिडी जास . रतडीना डाव म्हंतस ना तसं . जीवान चिडी ग्या . आनी शंकर महादेव तडक उठनात नी हिमालय पर्वतमा संतापमा निंघी ग्या जीवान . पार्वती नी गंज हाका मार्‍यात . पन त्या महादेव व्हतात . त्यासले संताप दाटी ऊना . त्या संताप मा हिमालय पर्वतना रांगासमा नबेदा व्हई ग्यात . पार्वतीनी गंजच शोध लिधा पन शंकरजी ना काई पत्ता लागना नई . मंग तिनी भिल्लीननं रूप लिनं . आनी अचानक भिल्लीन पार्वती शंकर महादेवना नजरमा पडनी . मंग त्यानी पन भिल्लानं रूप लिनं . धोतर पागोट आनी तो सुस्वरूप भिल्लिननं रूप दखीसन भुली गया . म्हनीसन शंकर महादेवले भुलोबा म्हंतस . अन् पार्वती ले भुलाबाई म्हंतस . त्यासनं मंदिर आकोट ले शे . पन अपभ्रंश व्हत व्हत आपला खान्देशमा गुलाबाई आनी गुलोजी म्हंतस . विदर्भाना भुलोजीराव राणा भुलाबाई … पोरी मातर कोजागिरी पोर्णिमा लोंग गाना म्हंतीस . रोज खिरापत वाटतीस . खिरापत मा भिंजेल हरभरानी दाय ‘ त्यामा गुई ‘ ‘ सात परकारनं फरसान ‘ मटकीनी उसय ‘ को जागिरीनं दुध उकाडनस त्या दुधमा चंद्रान दरसन लेतीस . गाना म्हंतीस . नाचतीस . टिपऱ्या खेयतीस . आखरीमा म्हंतीस ‘ गानी म्हनु ‘ घरी जावू … घरी जावू .. ” तर मंडई महिनाभर पोरीसना या उत्सोले उधान येल ऱ्हास . याना मांगे लोककला जागृत व्हस . शेती संस्कृतीना ‘ ग्रामीण संस्कृतीना पोरीसना महादेव पार्वतीले प्रसन्न कराना हाऊ उत्सो शे . आते या उत्सो ना लोप पावतांना दिशी राहयना हाई गोट मातर खरी शे . कारन शिक्षण ना प्रभाव . शिक्षण शाळा कॉलेजेस . क्लासेस मा पोरी जावाले लागन्यात . त्यासना पा आते ये तो जोयजे ? लोककला ‘ आपली पारंपारिक रिती भाती निदान जपी जरी ठी तरी आपन मोठ काम कये असं समजा ..! चला मंग मंडई ‘ गुलाबाईनी गुलोबा कसा वाटनात ? येस मंग ..!

विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 …….