कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन ahirani kavita sammelan

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन ahirani kavita sammelan

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस

भर उंडायामा पाणी पडी गया मना गहू मका बाजरी   कांदा बठ्ठा सडी गया मना शेतकरी बठ्ठा मरी गया

त्यांना माल बेभाव गया दाव लीईसन वावर मा गया
फाशी लीईसन देव दारे गया तरी सरकार ले येत नाही
दया

भर उंडायामा पाणी पडी गया मना गहू मका बाजरी
कांदा बठ्ठा सडी गया मना शेतकरी बठ्ठा मरी गया

शेतकरी ना पोऱ्या नोकरी लागा साठी अर्धा वयना झाया आमदार खासदार ना पोऱ्या 18 19 मा युवा नेता बनी गया शेतकरी ना पोऱ्यांना नाहीसे लग्न ना टाया

भर उंडायामा पाणी पडी गया मना गहू मका बाजरी कांदा बठ्ठा सडी गया मना शेतकरी बठ्ठा मरी गया

मोहन कवी करस पुढारीसले रावणा-या आते तरी शेतकरी साठी विधान भवन मईन काहीतरी मंजूर करीलया भर उंडयामा पाणी पडी गया मना गहू मका कांदा बाजरी बठ्ठा सडी गया

(अवकाळी पाऊस)

कवी मोहन अशोक पाटील सार्वे तालुका पाचोरा जिल्हा    जळगाव
हल्ली मुक्काम नासिक

ahirani kavita sammelan
ahirani kavita sammelan

कोनले लागनी गुचकी|

कोनले लागनी गुचकी|

७वं अहिराणी संमेलन कवी धुळे साठे

कोनले लागनी गुचकी|कोनले मनी याद येस हुई
काय माहित मायबापलेच| पोरेसोरेसनी याद येस हुई

गयाले लागनात झाडना पानठा | बहार फयफडावना येस
तशी परतेय फांदीले बी | मुई नी याद येस

तिन्ह अस्तित्व र्हास शुन्य | जर ती तपनी नही
म्हणून सावलीले बी ,उन नी याद येस

कोठेसाधसुध र्हास | तिना डोया म्हानं पाणी
घरे व्हावाडी लई जाणारा | पुर नी याद येस

जसा लागस मी गर्व कराले| मन्हा जींदगीवर
माल त्या म्हसनखाई मा | उडणारी राख नी याद येस..!

योगेश राजेन्द्र बोरसे
अवधान

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन

नदारी ना संसार


   (नदारी ना संसार )

काया  माटीमा ना वावर म्हा मांडा देवबा संसार
वावर मा जागलकी करी करी डोया थकनात पार

एवढं वाईट शे हाई शेतकरी न जगणं
कोल्ली जमिनीवर आशा  लाईसन जगणं

कपाय ना कुंकू नुसताच नावले शे उरेल
दारू नी गटार म्हा रोज ऱ्हास हाऊ पडेल

त्यान जगणं व्हई गे मनः साठे भार
काया माटीना देवबा मन्हा संसार

लगीन झाया पाशीन राब राब राबी राहणू
हिस्सा मा येयल जमीन बिघ बिघ ईकी राहणू

पोटना पोरीसना संसार थाटी राहणू
तसंच बकऱ्या कोंबड्यासन पोट भरी राहणू

दुष्काय नको पडू देऊ पाऊस पाणीतीन रान मन्ह वाहू दे
पोटना लेकरू साठे पदर खोशीसन झटू दे

नको आणूं सपन म्हा भी जीव देवांना इचार
लख लागू दे मन्हा नदारी ना संसार

लिखाणार –
चंद्रकांत डी कोळी(चंदू)
मु.पो. भरवाडे ता. शिरपूर जि. धुळे

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन

जय मानवताभिमानी

जय मानवताभिमानी!
    
शिकीस्नी ‘झक्कास’ ईकास करी बठनात!

  गाय मायलेच आते ह्या लोके इसरनात!
  यंत्रना जमानामा ‘नंदी’ रिकामा बसनात
  छडीबिगर पोरे ह्या आसा काई बिघडनात;
  गुरुजी नि मायबाप ते येडाच ठयरनात!
  शिकीस्नी आसा लोके ‘शाना’ बननात ;
कोनीच कोनं ऐकेना! नातंभाडं इसरनात!
  गुटखा दारु सिगरेटनी नशामा बुडनात!
  मोबाईलले ते भाकरच समजी बसनात!
  लोके आते ईत्ला आसा आयधी बननात;
गल्ली ते दिल्ली फुकटमांगो रॅल्या निंघन्यात!
पैसा ज्यास्ले परमेसर! हायहायमा गुतनात
हाफ तिकीटमाच त्या स्वर्गाले जाई बठनात!
  नितिमत्ता सरसकट सर्वाच गी बसनात!


  सरकारी नोकर ह्या कामचुकार बननात!
  आधिकारी ह्या भ्रष्टाचारमा बरबटनात!
पुढारी बोख्या ते ‘खोकामा’ खेयत बसनात!
  लोके निस्ता स्वार्थ चाफलत बसनात!
  ताण नको लेकना!; पोरीबी घटन्यात!
शिकेल-लिखेल पोरी ताठा करी बसन्यात;
लगनसाठे डझनभर अटी घाली बसन्यात!
तरुण पोरे ठायकेच जीव बायत बसनात!
माडर्न सूनासमुये घरेबी कैक भो तुटनात!
जवाईना संसारमा सासवा अश्या घुसन्यात;
  कईक सूना ते माहेरलेच ताशी बठन्यात!
  लोकशाहीले लोके असा ‘न्यामी’ भेटनात;
शिकीस्नी असा ‘झक्कास’ ईकास करी बठनात!

©️®️गुलाबराव धंजी मोरे,धुये

आदर-सन्माननी अ. भा. अहिराणी साहित्य संम्मेलननी आयोजक मंडळीले गुलाबराव मोरे, धुये यास्ना प्रेमपूर्वक राम राम.

मी दि. २४ फेब्रुवारी २०२४ ले व्हनारा ७ वा अ. भा. अहिराणी साहित्य संम्मेलनसाठे मनी स्वरचित कविता “शिकीस्नी ‘झक्कास’ ईकास करी बठनात!”धाडी र्हायनू. स्विकार करासाठे आदर-सन्मानना आयोजक मंडळले मनी नम्र ईनंती.

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन

म्हना जीव तुना मा रमना

!! म्हना जीव तुना मा रमना !!

म्हना जीव तुना मा रमना
म्हना जीव तुना वर जडना
मन धरनी तुनी करतांना
बिचारा कितला तो रडना १

डोळासना रांजण उपशीसन मी
टाका तुना मी वाट वर सडा
तुना भरोसा ठेवा काळीजमा
गया कशा त्या काळीजले तडा….
भेट अपुली शेवटनी व्हयी जाओ….
खेळ आता जीवना म्हना थांबना…   २

जगन म्हन काटा कुटा न
काळीज म्हन रक्त भंबाळ
आठवनी तुन्या ताटा तुटा न्या
त्याच करतीन म्हना संभाळ
3

मरण ना दारमा उभा मी रहासू
तुले पाहसु ….तु नही दिसणार
भेट कवळ कदळ व्हयी आता
तो भरोसा कोणता कुठला जनम ना….   ४

म्हना जीव तुना मा रमना


सतिश गंगाधर येवला
मु. पो. तिळवण
ता. बागलाण जि. नाशिक

Khadeshi Ahirani Poem

सगळा जण ठेवा शांती

सगळा जण ठेवा शांती चहार्डी गावणी आयका क्रांती वाकडी तिकडी खिडकीमा चिडीना खोपा कपडा शिये आत्माराम शिपा
आत्माराम शिपाणी फेकी सुई गावळ्या पाये झेंडा कुई झेंडा कुईनी गावळी बरी अशोक भाऊसाहेब करेत दातनचिरी
अशोक भाऊसाहेबनी फेका कांदा दगडू भाऊसाहेबना सदा वांधा
दगडू भाऊसाहेबना बोलामा नही ठिकाण साहेबराव कानडेन दारुन दुकान
दारुन  दुकान उघडे लेट दुकानावर बसना बोरकुंडकर प्रवीण शेठ
प्रवीण शेठनि लिधी कोबी कपडा धोये सुरेश धोबी
सुरेश धोबीनि तापाडी इस्तरी बांधकाम करे सुकलाल मिस्त्री
सुकलाल मिस्त्रीनी फेकी द उत हजामतकरे शिवाजी राउत
शिवाजी  राउतनी फेका वस्तरा माधवराव सुकलाल ले उना पस्तावा


माधवराव सुखलालले लोकेसनी दिधी भर शेवट सरपंच झाया कडू सर
कडूसरनी लाव ग्रामपंचायतले अस्तर म्हणून डेपोटी सरपंच खंडा मास्तर
खंडाळा मास्तरनी लिधा टोमा वना आप्पा मारे बोंमा
वना आप्पानी काढा दुधना फँट गुलाब चौधरीना हातमा सदा पत्तानी गँट
गुलाब चौधरी मारस गप्पा
गढीवर रहास बापु आप्पा
बापु आप्पानी आणी हिंमत लोटुनी जमनी जोडी,जिजाब नानानी लाल घोडी
लाल घोडीले टाकी चंदी ,चंदु पेंटरले कायम मंदी
चंदु पेंटर करीन काय चहार्डीमा से कमयजा माय

आयुष्य

आयुष्य

काय रे आथा बशेल शे
कामधंदा नहीका तुना जोडे
शिक्षण कमी शिकेल शे दादा
म्हणुन नोकरी येत नही मन्हा जोडे,,

अरे काय नोकरी नोकरी करतस
व्यवसाय टाका घराजोडे
तशी बात नही शे दादा
आतेका हात पसारू लोकेसपुढे,,

यंदा पिकाचं नुकसान व्हईन
म्हनुन लटकिगया बाप झाडावरे
फाटक्या पदरले पुशी राईन्थी डोया
आन मी देखीराहेतु तीना पायाजोडे,,

सोप नही रास दादा मन्हा
शेतकरी ना घरमा जनम लेव्हानं
दिनभर धुयमाटीमा फिरीसन
रातले बीन पंखानं जपानं,,

आसस लिव्हेल शे दादा आम्हनं आयुष्य
धव्या कागदावर त्या सटवाईनं

  कवी:- कुशल दुसाने,(ऋतुगंध)
          मु पो आसोदा ता जि जळगाव
      मो:-७०३८८४९२४३