अहिराणी लेख आपलाच आपले नडतस दिलीप हिरामण पाटील

अहिराणी लेख आपलाच आपले नडतस

लोकेसनं काय ली बसनात लोके पाये भी चालू देतस नही.आणि घोडावर भी बसू देतस नही. देशमा, राज्यमा, प्रांतमा,गावमा गल्लीमा, राजकारणमा,समाजमा, घरदारमा भाऊबंदकीमा,कोठेभी. कोणता भी क्षेत्रामा देखा या किडापाडतस नी येरायेरना पाय व्हतडस.पुढे जाणाराले कधी पुढे जाऊ देतस नही.त्यांना मांगे लागतस.यानं कसं काय चांगलं व्हस आपलं कसं व्हत नही.तो जसं कष्ट करस तसं तु भी कर तूनं भी चांगलं व्हयी पण त्यानी ध्यानत काही चांगली रहास नही.यानं कसं नुकसान व्हई असंच या शोधत रहातस.याले खड्डामा कसं उतारानं कसं हानी पाडानं असा इचार कायम यासना मनमा फिरत रहातस.बस् त्यासनी याच कामे करत फिरांनं येना त्यानां बाबतमा काढ्याच मोडत रहो.तो असा तो तसा यासले काही काम-धंधा रहास नही.


कायमच झुरत रहोत यासनी. टिका टिप्पणी करत फिरवो. स्वतानं घरमा कितलं अंधारं रहास हायी जसं कोणलेच माहीत नही. आपलं झांकी ठेवं आणि दुसरानं वाचत फिरवो

गल्ली आल्लीमा शेजार पारना कान भरत राहो.शेजार पाजारना लोकेसलेभी मंग त्यानं खरं पटस आणि कायम खेटाय पणा करतस.आपलं काहीच सहीन व्हत नही.त्यासना पसारा आपण सहीन करत राहो.ममं म्हणत जावो पण त्यासनं जे से ते चालूच रहास.एखादाला ती आदतच पडी जायेल रहास ती काही मरस तवं सुटत नही. त्यानी याच कामे करत राहो कायम आथानं तथ्थ तथानं आथ्थ समोरना माणूस इचार करस.आपण कोणा लेवा देवामा नहीत.तरी भी या आपला काबरं खार करतस व्हतीन हायी काही समजत नही.माणूस असा विचार करत जास.पण जसा जसा दिन जातस तसा तसा माणूसले याद येत रहातस.इतलं चांगलं वागीसन भी या लोके असं काबरं करतस व्हतीन.हायी माणूस ले खटकसं ते मनमा असं वाटस की कोणा करता काहीच करवो नही.आपलं आपलं देखवो.जिवन कसं जगता ई याना इचार करत राहवो.शेवट कसं से यानी जानीव आपले कव्हय भी व्हावा शिवाय रहात नही.
आपलाच‌ आपले नडतस
हायी दिशी उनं
……

दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३