संध्याकाय व्हयनी म्हंजे

कवीसंमेलन    ७ वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुय्ये  आयेजित 
पत्र

संध्याकाय व्हयनी म्हंजे तीनी
वट्टाना कोर वर ईसन
रोज दर्जाकडे देखो.

एस टी ना आवाज येताच
तीना हिरदामा धडधड व्हस
तीबी आयको.

आन्नाडु व्हती ती पण त्याले शिकाडीसन
भरतीमा भरीसन फौजी कर
तो सुट्टीमा ये जाये तवयच तीले बर वाटे.

फोन बीन काय न्हई व्हता तीना पा
पत्र येताच पोस्टमन घाई वाचीले
त्यांना खुलासा.

तीबी पत्र आयकता रडी दे
पोस्टमन काई शबद वाचे
काई शबद सोडी दे .

तीन रडू त्यांना घाई देखाये न्हई
ते पत्र तीले समाईन ठेवाले सांगी जाये
जड मन करीसन .

गहीरा वरीस हुई गयात आते त्याले जावाले.
…..पण पोस्टमन येस ना रोज त्या जुना पत्रा वाचाले
दिन मावयना का
बांधशिनवर दिवा लावस
खाट ना खालनी पत्रास्नी
पेटीवर हात फिरावस .

पण तीन वाट देखान काय थांबस न्हई
आंगवरल लुगड आवरत आवरत
वट्टाना कोरवर यस …
ती त्यांनी वाट देखाले .

                       कल्पना देवरे

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन